शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Mira Road: घोडबंदर किल्ला मनपाच्या मालकीचा नसताना भाड्याने देण्याचा ठराव केलाच कसा? शिवप्रेमींच्या संतापानंतर पालिकेची दिलगिरी

By धीरज परब | Updated: July 25, 2024 23:53 IST

Mira Road News: घोडबंदर गावातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ला हा महापालिकेच्या मालकीचा नसताना देखील त्याचे भाडे मूल्यांकन करून भाड्याने देण्याचा ठराव केला करा ? असा संताप आ . सरनाईक सह शिवप्रेमींनी व्यक्त केला .

मीरारोड -  घोडबंदर गावातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ला हा महापालिकेच्या मालकीचा नसताना देखील त्याचे भाडे मूल्यांकन करून भाड्याने देण्याचा ठराव केला करा ? असा संताप आ . सरनाईक सह शिवप्रेमींनी व्यक्त केला . तर अन्य मालमत्तांच्या यादीत किल्ल्याचे नाव चुकून आल्याने तो भाड्यावर दिला जाणार नसल्याचे सांगत पालिकेने दिलगिरी व्यक्त केली आहे . 

मीरा भाईंदर महापालिकेच्या प्रशासकीय बैठकीत बांधकाम विभागा कडून शहर अभियंता दिपक खांबित यांनी पालिकेच्या अनेक मालमत्ता ह्या भाड्याने देण्या बद्दल प्रस्ताव दिला होता . त्या यादीत ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचा समावेश होता . खांबित यांनी दिलेला प्रस्ताव मंजूर होऊन तसा ठराव केला गेला . 

मात्र भाड्याने देण्याच्या मालमत्ता यादीत घोडबंदर किल्ल्याचा समावेश केल्याचे समजताच शिवसेना शिंदे गट आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त संजय काटकर यांना निवेदन देऊन ऐतिहासिक घोडबंदर किल्ला हा महाराष्ट्राचे वैभव असून पवित्र असा किल्ला भाड्याने देण्याचा ठराव रद्द केला नाही तर आंदोलन करू असा इशारा दिला . 

शहर अभियंता खांबित यांनी पत्रक काढून ,  ठराव यादीमध्ये नजरचुकीने ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचा उल्लेख झालेला असून ती मानवीय चुक झाली असल्याचे स्पष्ट केले आहे . किल्ला हा महानगरपालिकेच्या मालकीचा नसल्याने भाडे तत्वावर देण्याचा कोणताही मानस नाही.  शिवप्रेमी व जनतेची दिशाभुल झाली याबद्दल प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सदरच्या ठरावात दुरुस्ती करुन नव्याने ठराव पारित करण्यात येईल असे प्रतिपादन आयुक्त काटकर यांनी केले आहे. 

मुळात घोडबंदर किल्ला हा ऐतिहासिक असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्श झालेला किल्ला आहे . पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील किल्ला पालिकेला केवळ देखभालीसाठी दिला असून भाड्याने देण्याचा अधिकारी पालिकेला नाही . पुरातत्व विभाग आणि शासनाची मंजुरी न घेता घोडबंदर किल्लाच भाड्याने ठेकेदारास देण्याचा लाजिरवाणा प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी अनेक शिवप्रेमींनी केली आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणे