शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

मीरा रोडमध्ये फेरीवाल्यांचा जाच दिवसेंदिवस वाढताच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 20:20 IST

मीरा रोडच्या शांती पार्क, गोकूळ व्हिलेज भागात फेरीवाल्यांचा जाच मोठा असताना कारवाई तर दूरच उलट दिवसागणिक त्यांची संख्या वाढत असल्याने स्थानिक रहिवाशांसह भाजपाच्या महिला पदाधिकारी सुरेखा शर्मा यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.

मीरा रोड - मीरा रोडच्या शांती पार्क, गोकूळ व्हिलेज भागात फेरीवाल्यांचा जाच मोठा असताना कारवाई तर दूरच उलट दिवसागणिक त्यांची संख्या वाढत असल्याने स्थानिक रहिवाशांसह भाजपाच्या महिला पदाधिकारी सुरेखा शर्मा यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. विशेष म्हणजे पालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी येथेच सभा घेतली होती. प्रभागात चार ही नगरसेवक भाजपाचे निवडून आल्यानंतर हा प्रकार घडत असल्याने शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेत सत्ताही भाजपाची असल्याने भाजपाला मिळालेला घरचा अहेर मानला जातोय.मीरा रोडच्या आरएनए ब्रॉड वे-जांगीड सर्कलपर्यंतच्या मुख्य मार्गावर बसणा-या फेरीवाल्यांवरून तत्कालीन नगरसेविका वंदना चक्रे यांच्यावर टीका केली जात होती. पालिका निवडणुकीत सदर प्रभागातून चक्रेसह सेनेच्या पॅनलचा पराभव झाला व भाजपाच्या दीपिका अरोरा, हेमा बेलानी, प्रशांत दळवी व आनंद मांजरेकर हे चारही नगरसेवक निवडून आले. महत्वाचे म्हणजे निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील संत झेव्हियर्स शाळेजवळच जाहीर सभा घेतली होती.भाजपाचे सर्व नगरसेवक असताना येथील रस्ते, पदपथ आदी सार्वजनिक ठिकाणं अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई होईल व दिलासा मिळेल, अशी आशा लोकांना होती. परंतु आधीचे फेरीवाले, हातगाडीवाले हटवणं तर दूरच उलट नव्याने फेरीवाल्यांची संख्या झपाट्याने वाढायला लागल्याने लोक हैराण आहेत.येथील संत झेव्हियर्स शाळेसमोरील परिसर, गोकूळ व्हिलेज, शांती दर्शन, ग्रीन व्ह्यू आदी इमारतींच्या बाहेर तर फेरीवाल्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शाळा, धार्मिक स्थळ, रुग्णालय परीसरात फेरीवाल्यांना मनाई केली असली तरी या ठिकाणी सर्रास फेरीवाले बसत आहेत.यामुळे शाळेच्या तसेच सायंकाळच्या वेळात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. विद्यार्थी तसेच नागरिकांना रहदारीला अडथळा होत आहे. शिवाय चो-या वाढल्याचे शर्मा म्हणाल्या. रहिवाशांनी पालिकेसह स्थानिक सर्व भाजपा नगरसेवकांकडे देखील या वाढत्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबद्दल तक्रारी करून देखील कारवाईच केली जात नाही. सर्व नगरसेवक भाजपाचे असूनही हा प्रकार होत असल्याने शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथील काही नगरसेवकांनी कारवाईसाठी खानापूर्ती म्हणून पत्र दिली आहेत. पण कारवाईसाठी मात्र पाठपुरावा केला जात नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :mira roadमीरा रोडhawkersफेरीवाले