शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Mira Road: ऑनलाईन टास्क चे काम सांगून ५ जणांची ५९ लाखांना फसवणूक   

By धीरज परब | Updated: January 14, 2024 23:52 IST

Mira Road Crime News: सायबर लुटारूंनी टेलिग्राम द्वारे संपर्क करून ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष दाखवून भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीतील ५ जणांची तब्बल ५९ लाख ४७ हजार रुपयांना फसवणूक केली आहे . त्यापैकी भाईंदरच्या एका तरुणीचे एकटीचे सुमारे ४० लाख तर एका व्यक्तीचे १२ लाख आहेत . 

मीरारोड - सायबर लुटारूंनी टेलिग्राम द्वारे संपर्क करून ऑनलाईन टास्क पूर्ण करण्याच्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष दाखवून भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीतील ५ जणांची तब्बल ५९ लाख ४७ हजार रुपयांना फसवणूक केली आहे . त्यापैकी भाईंदरच्या एका तरुणीचे एकटीचे सुमारे ४० लाख तर एका व्यक्तीचे १२ लाख आहेत . 

भाईंदर पूर्वेच्या नवघर मार्गावरील सरस्वती सदन मध्ये राहणाऱ्या निकिता दिगंबर चव्हाण यांच्या फिर्यादी वरून नवघर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री अनोळखी सायबर लुटारूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अनोळखी व्यक्तीने टेलिग्राम द्वारे संपर्क करत ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास बसल्या बसल्या चांगली कमाई होईल असे आमिष दाखवले . पार्टटाइम जॉब असल्याने चव्हाण सह हितेश बाबरीया व अन्य तिघांनी देखील ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सुरवात केली . सुरवातीला काम केल्याचे काही पैसे देण्यात आले . नंतर मात्र टास्क म्हणून गुंतवलेले पैसे परत मिळण्यासाठी देखील आणखी पैसे भरण्याची मागणी होऊ लागली . नंतर मात्र पैसे मिळाले नाहीत म्हणून फसलेल्या लोकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली . 

निकिता चव्हाण यांची सुमारे ४० लाख रुपयांना फसवणूक झाली आहे तर हितेश बाबरीया यांना सुमारे १२ लाखांना फसवले आहे . या शिवाय अन्य तिघांची सुद्धा फसवणूक केली आहे . पोलिसांनी ह्या ५ जणांच्या फसवणुकीचा एकत्र गुन्हा दाखल करून घेतला आहे . गुन्ह्याचा तपास वरिष्ठ निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय केदारे हे करत आहेत . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmira roadमीरा रोडcyber crimeसायबर क्राइम