शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोडला बिल्डरकडून ५० कोटींची फसवणूक, दोघांना अटक, तिसरा फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 03:46 IST

मीरा रोड : काशिमीरा पोलीस ठाण्यामागील तन्वी इमिनन्स या बहुमजली बांधकाम प्रकल्पात सदनिका खरेदी करणा-या ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघा भागीदार विकासकांना अटक केली

मीरा रोड : काशिमीरा पोलीस ठाण्यामागील तन्वी इमिनन्स या बहुमजली बांधकाम प्रकल्पात सदनिका खरेदी करणा-या ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघा भागीदार विकासकांना अटक केली आहे, तर एका आरोपीचा शोध सुरु आहे. या फसवणुकीचा आकडा तब्बल ५० कोटींच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले.काशिमीरा पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात घरे खेरदी करणाºयांना ताबा न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी तन्वी प्रकल्पाचे भागीदार संगीता विजय हेगडे, दयाभाई सुतारिया व भूपतभाई राजीवभाई लुखी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. खरेदीदारांच्या फसवणुकीची रक्कम कोटींमध्ये असल्याने या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्याकडे सोपवण्यात आला होता.गुन्हे शाखेने या प्रकरणी भूपतभाई लुखी याला आधी अटक केली होती. तर रविवारी रात्री संगीता विजय हेगडे (४१) हिला अटक करण्यात आली आहे. हेगडेला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तिसरा आरोपी दयाभाई सुतारियाचा शोध सुरु आहे.तन्वी ग्रूपने बहुमजली तन्वी इमिनेन्स या नावाने वसाहत बांधण्यास घेत २०१० पासून सदनिकांची नोंदणी सुरु केली होती. यात फेज एकच्या इमारतीला दहा मजली, तर फेज दोनच्या इमारतीस पालिकेकडून पाच मजल्यांचीच परवानगी असताना विकासकांनी मात्र सुरूवातीला फेज एकची इमारत १८ मजली, तर फेज दोनची इमारत १४ मजली असल्याचे सांगून घरे विकण्यास सुरुवात केली होती.बिल्डरने आतापर्यंत ५० हजार रुपयांपासून ४० ते ५० लाख रुपयांची रक्कम ग्राहकांकडून घेतली आहे. करारनामा झाल्यावर तीन वर्षात घराचा ताबा देण्याचे आश्वासनही बिल्डरने पाळले नाही.गेल्या दीड-दोन वर्षांपासून काम बंदच आहे. टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असल्याने काही खरेदीदारांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.>दीड वर्षे थांबले होते प्रकल्पाचे कामया प्रकल्पाचे काम गेली सात वर्षे मार्गी लागलेले नव्हते. त्यातही गेल्या वर्ष-दीड वर्षात ते जवळपास ठप्प होते. ते का मार्गी लागत नाही, याबबात वावंरवार विचारणा केल्यावरही घरे घेणाºयांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात होती. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले.आतापर्यंत दोन विकासकांना अटक केली आहे. सुमारे ५० लोकांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून फसवणुकीची रक्कम १५ कोटींच्या घरात आहे. फसवणूक झालेल्यांची संख्या वाढत असुन ही रक्कम सुमारे ५० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.- व्यंकट आंधळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा