शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Mira Road: माजी आमदाराच्या बांधकाम प्रकल्पात काम करणाऱ्या मजुराचा डोक्यात दगड पडून मृत्यू 

By धीरज परब | Updated: May 25, 2024 23:14 IST

Mira Road News: माजी भाजपा आमदार  यांच्या मीरारोडच्या विनय नगर जवळील आपना घर फेस ३ च्या बांधकाम प्रकल्प ठिकाणी वरून डोक्यावर दगड पडल्याने एका २२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे . ह्या प्रकरणी काशिगाव पोलिसांनी अपना घर फेस ३ चा सुपरवायझर आणि कंत्राटदार वर ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे .

मीरारोड - माजी भाजपा आमदार  यांच्या मीरारोडच्या विनय नगर जवळील आपना घर फेस ३ च्या बांधकाम प्रकल्प ठिकाणी वरून डोक्यावर दगड पडल्याने एका २२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे . ह्या प्रकरणी काशिगाव पोलिसांनी अपना घर फेस ३ चा सुपरवायझर आणि कंत्राटदार वर ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे . तर या ठिकाणी पूर्वी देखील मृत्यूच्या घटना घडल्या असताना पोलिसांनी ३०४ कलम न लावल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

अपना घर फेज ३ ह्या  सेव्हन इलेव्हन कंस्ट्रक्शन कंपनीच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे . सदर कंपनी हि भाजपाचे मीरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता व कुटुंबीयांची आहे . शुक्रवारी दुपारी अपना घर फेस ३ येथील बांधकाम प्रकल्पात काम करणारा २२ वर्षीय डबलू ब्रिजलाल यादव ह्या मजुराच्या डोक्यात वरून दगड येऊन पडला . त्यात गंभीर इजा होऊन त्याचा मृत्यू झाला . त्याला भाईंदरच्या भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

या प्रकरणी डबलू याच्या भावाच्या फिर्यादी नंतर २४ मेच्या रात्री काशिगाव पोलिसांनी अपना घर फेस ३ चा सुपरवायझर आणि कंत्राटदार वर ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला . सुपरवायझर व कंत्राटदार यांनी कामगाराच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपायोजना राबवली नाही व त्यांच्या सुरक्षे प्रति बाळगलेल्या निष्काळजीपणामुळे डबलू यादव याचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.

ह्या आधी सप्टेंबर २०२३ मध्ये अपना घर फेस ३ येथील बांधकाम ठिकाणी लोखंडी अँगल डोक्यावर पडून ४ वर्षांच्या सुभो सुधांशू दास व  ६ वर्षांचा जयंत उर्फ जयंतो बच्चन दास ह्या दोन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला होता . त्यावेळी काशीमीरा पोलिसांनी महेंद्र कोठारी वर गुन्हा दाखल केला होता . तर फेब्रुवारी २०२४ मध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्या वरून पडून मुकेश सिंह मार्को ( २६ ) ह्या तेथे आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला होता.

सातत्याने याठिकाणी दुर्घटना आणि मृत्यू होऊन देखील सुरक्षेची काळजी न घेतल्याने आणखी एक बळी गेला असताना पोलीस मात्र जुजबी कलम लावून मालक वा लाभार्थी यांना आरोपी करत नसल्या बद्दल सत्यकाम फाउंडेशनचे कृष्णा गुप्ता , जिद्दी मराठा चे प्रदीप जंगम आदींनी नाराजी व्यक्त केली आहे . 

टॅग्स :mira roadमीरा रोडthaneठाणे