शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

Mira Road: भाजप महिला जिल्हाध्यक्षाच्या भावावर वीजचोरीचा गुन्हा दाखल   

By धीरज परब | Updated: July 24, 2024 21:21 IST

Mira Road News: मीरा भाईंदर भाजपा महिला जिल्हाध्यक्षा यांच्या भावावर ५ लाख ४८ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचा गुन्हा अदानी वीज कंपनीने दाखल केला आहे .

मीरारोड - मीरा भाईंदर भाजपा महिला जिल्हाध्यक्षा यांच्या भावावर ५ लाख ४८ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचा गुन्हा अदानीवीज कंपनीने दाखल केला आहे . मीरा भाईंदर भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि माजी नगरसेविका अनिता पाटील ह्या मीरारोडच्या पेणकरपाडा येथे राहतात . त्याच भागात त्यांचा सख्खा भाऊ राजेश शामलाल चौहान हा शामल निवास येथे राहतो . चौहान ह्याने अदानीच्या विजेची चोरी चालवल्याची माहिती कंपनीला मिळाल्या नंतर कंपनीच्या पथकाने येऊन पाहणी केली . त्यात चौहान ह्याने वीज चोरी केल्याचे उघडकीस आले . 

डिसेम्बर २०२१ ते १६ जुलै २०२४ दरम्यान राजेश चौहान ह्याने बेकायदा वीज जोडणी द्वारे २६ हजार ७५८ युनिटची वीज चोरी केली . त्याची दंडास रक्कम ५ लाख ४८ हजार रुपये इतकी आढळून आली .  कंपनीचे तन्मय पाटील यांच्या फिर्यादी वरून काशीमीरा पोलिसांनी चौहान विरुद्ध  भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार गुन्हा दाखल केला आहे . वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय गंभीरराव हे करत आहेत. 

राजेश चौहान ह्याने एका पत्रकारावर हल्ला केला होता त्याचा गुन्हा दाखल आहे . ह्या शिवाय सरकारी जागेत बेकायदा बांधकाम करण्या पासून विविध तक्रारी व गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत . परंतु राजकीय वरदहस्त असल्याने महापालिका आणि पोलीस हे चौहान वर ठोस कारवाई करत नाही तसेच त्याने सरकारी जमिनीवर केलेली बेकायदा बांधकाम , विक्री आदी प्रकरणी कारवाई करत नसल्याचा आरोप जागरूक नागरिकांनी केला आहे . 

टॅग्स :electricityवीजmira roadमीरा रोडBJPभाजपाAdaniअदानी