शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर रेल्वे स्थानके हायटेक होणार; खासदार राजन विचारे यांनी घेतला कामांचा आढावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2023 13:34 IST

मार्च २०१९ ला रेल्वे बोर्डाकडून ९५० कोटींची मंजुरी या प्रकल्पासाठी मिळविली.

शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने बोरीवली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर मिरारोड व भाईंदर या दोन रेल्वे स्थानकांचा डेक लेवलवर होत असलेल्या विस्तारीकरणाच्या कामाची पाहणी आज एमआरव्हीसी व पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत केली. खासदार राजन विचारे यांनी गेल्या आठ वर्षाच्या कार्यकाळात प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देऊन त्यांच्याच पाठपुराव्याने सन २०१७-१८ मध्ये मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकाच्या विकासाचा मुद्दा उपस्थित केला असता एमआरव्हीसी ने MUTP 3A च्या प्रकल्पामध्ये १९ रेल्वे स्थानकांचा विकास प्रकल्प अहवाल बनविण्यात आला होता.

मार्च २०१९ ला रेल्वे बोर्डाकडून ९५० कोटींची मंजुरी या प्रकल्पासाठी मिळविली. त्यामध्ये मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकांचा समावेश करून ११० कोटी खर्च करण्यात येणार आहे. त्यापैकी मिरारोड रेल्वे स्थानकासाठी ६० कोटी व भाईंदर रेल्वे स्थानकासाठी ५० कोटी खर्च करणार आहेत. त्यानंतर एमआरव्हीसीने पश्चिम रेल्वे मार्गावर ७ रेल्वे स्थानके व मध्य रेल्वे मार्गावर १० रेल्वे स्थानके अशी एकूण अंतिम १७ रेल्वे स्थानकांच्या विकासासाची कामे सुरू केली आहेत. त्यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील मिरा रोड व भाईंदर या रेल्वे स्थानकांचा बोरीवली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर डेक लेवलवर होणाऱ्या विस्तारीकरण कामाची पाहणी करण्यात आली.

या दोन्ही रेल्वे स्थानकात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता व अपुरे पडणारे फलाटे यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यापैकी मीरा रोड रेल्वे स्थानकात अस्तित्वात असलेले ४ + २ असे एकूण सहा फलाट तयार होणार आहेत व भाईंदर रेल्वे स्थानक येथील फलाटांची संख्या ६ + १ असे एकूण सात फलाट होणार आहेत. भविष्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांना या रेल्वे स्थानकात थांबा मिळू शकेल. आज या केलेल्या पाहणी दौऱ्यात फलाटावरील पहिल्या मजल्यावरील डेक लेवलची पाहणी केली. त्यापैकी मीरा रोड रेल्वे स्थानकातील सुरु असलेली कामे मार्च २०२५ मध्ये पूर्ण करणार व भाईंदर रेल्वे स्थानकात फेब्रुवारी २०२४ मध्ये काम सुरु होऊन डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करून देणार, असे आश्वासन एमआरव्हीसीचे चीफ प्रोजेक्ट मॅनेजर विलास वाडेकर यांनी खासदार राजन विचारे यांना दिले आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर