शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट टर्फच्या परवानगी शुल्कात मीरा भाईंदर पालिकेची भरघोस सवलत 

By धीरज परब | Updated: January 21, 2023 19:59 IST

एकीकडे प्रभाग अधिकारी व अतिक्रमण विभाग प्रमुख , उपायुक्त यांच्या कडून कारवाई होत नसताना बेकायदा चालणाऱ्या टर्फ चे परवानगी शुल्क कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला .

मीरारोड - मीरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर क्रिकेट टर्फ चालकांनी पालिकेची परवानगी घ्यावी ह्यासाठी प्रशासनाने प्रति चौमी असलेले १ हजार २७० रुपये इतके शुल्क कमी करत आता केवळ १५० रुपये प्रति चौमी इतके केले आहे . 

शहरातील अनेक मोकळ्या जागां वर पालिकेची परवानगी न घेताच मोठ्या प्रमाणात बेकायदा क्रिकेट टर्फ उभारून त्याचा व्यवसाय चालवला जात आहे . अनेक टर्फ तर पालिका आरक्षण , कांदळवन व सीआरझेड क्षेत्रात तसेच नाविकास वा इको सेन्सेटिव्ह क्षेत्रात बेकायदा उभारून देखील ठोस कारवाई पालिके कडून होताना दिसत नाही. 

सदर टर्फ हे बक्कळ फायदा कमावण्यासाठी उभारले जात असतानाच दुसरीकडे रात्री अपरात्री ह्या टर्फ वर चालणारा गोंधळ - हुल्लडबाजी , ध्वनी प्रदूषण तसेच चालणारे व्यसन आदींच्या तक्रारी सुद्धा होत असतात . दरम्यान सदर टर्फ ना शुल्क आकारून पालिकेचे उत्पन्न वाढवावे ह्या साठी मे २०२१ मध्ये प्रशासनाने कार्यालयीन आदेश काढून टर्फ ना परवानगी देण्यासाठी काही अटीशर्ती तयार केल्या . त्या मध्ये मुख्यत्वे अनामत रक्कम  साठी १० हजार व १२७० रुपये प्रति चौमी प्रमाणे शुल्क आकारण्याचे नमूद होते. परंतु तरी देखील पालिकेचे शुल्क भरून परवानगी घेण्याचे टर्फ चालकांनी सपशेल धुडकावून लावले . एकीकडे बक्कळ फायदा कमावत दुसरीकडे पालिकेचे शुल्क भरून परवानगी घेतली जात नसताना देखील पालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी मात्र बेकायदा टर्फ ना पाठीशी घालत अर्थपूर्ण संरक्षण दिले. 

एकीकडे प्रभाग अधिकारी व अतिक्रमण विभाग प्रमुख , उपायुक्त यांच्या कडून कारवाई होत नसताना बेकायदा चालणाऱ्या टर्फ चे परवानगी शुल्क कमी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला . टर्फचे शुल्क १२७० रुपयां वरून कमी करून केवळ १५० रुपये प्रति चौमी इतके आता करण्यात आले आहे . टर्फ चालकांना प्रचंड मोठा आर्थिक दिलासा पालिकेने दिला असून आता तरी पालिकेचे शुल्क ते भरतील आणि परवानगी घेतील अशी अपेक्षा पालिका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे . तर एकीकडे पालिका कर्ज वाढले म्हणून कर - दरवाढ करत असताना टर्फ चालकांवर इतकी मेहेरबानी दाखवल्या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक