शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या पहिल्या ४ इलेक्ट्रिक बस प्रवाश्यांच्या सेवेत

By धीरज परब | Updated: October 31, 2023 19:38 IST

जानेवारी महिन्या पर्यंत सर्व इलेक्ट्रिक बस पालिका परिवहन सेवेत दाखल होणार आहेत . 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झालेल्या पहिल्याच ५ इलेक्ट्रिक बस पैकी ४ बस नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत . पर्यावरणपूरक ठरणाऱ्या इलेक्ट्रिक बस पहिल्यांदाच पालिका ताफ्यात आल्या असून आणखी ५२ इलेक्ट्रिक बस  टप्याटप्याने येणार आहेत. 

१५ व्या वित्त आयोगाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत मीरा भाईंदर महापालिकेला ८१ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान मंजूर आहे . त्यातील २८ कोटी १५ लाख इतके अनुदान हे ५७ ई बस खरेदीसाठी महापालिका वापरत आहे . हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी ई बस खरेदी केल्या असून ५७ ई बस पैकी ३२ मिडी आकाराच्या तर १५ स्टॅंडर्ड आकाराच्या विना वातानुकूलित बस तसेच १० स्टॅण्डर्ड आकाराच्या वातानुकूलित बस असणार आहेत. 

५७ पैकी ५ ई मिडी आकाराच्या बस महापालिकेच्या परिवहन उपक्रमात दाखल झाल्या असून त्या पैकी ४ बस ह्या प्रवाश्यांच्या सेवेत सुरु करण्यात आल्या आहेत . पालिकेच्या पहिल्या ई बस चे लोकार्पण सोहळा आयुक्त संजय काटकर तसेच आमदार प्रताप सरनाईक व आमदार गीता जैन यांच्या हस्ते सोमवारी रात्री घोडबंदर येथील पालिकेच्या नामदार जगन्नाथ नाना शंकरशेट बस आगार येथे पार पडला.   

यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा परिवहन व्यवस्थापक अनिकेत मानोरकर, उपायुक्त संजय शिंदे, प्रशासकीय अधिकारी दिनेश कानगुडे , बस उत्पादक यांचे प्रतिनिधी, तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर , विभागप्रमुख महेश शिंदे , माजी परिवहन समिती सभापती मंगेश पाटील सह माजी सदस्य आदी उपस्थित होते . त्यांनी बस मधून प्रवास केला . आयुक्तांनी बस चे पहिले तिकीट घेतले . 

भाईंदर पूर्व रेल्वे  स्थानक ते के . डी . एम्पायर ह्या बस मार्ग साठी २ इलेक्ट्रिक बस तर  मीरारोड रेल्वे स्थानक पूर्व ते जे. पी. नॉर्थ सिटी या मार्गावर २  इलेक्ट्रिक बस चालवण्यास सुरवात केली आहे . नवीन बस मुळे प्रवासी सुद्धा  आनंदित झाले आहेत . हवेतील प्रदूषण कमी होणार असून पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्या पर्यंत सर्व इलेक्ट्रिक बस पालिका परिवहन सेवेत दाखल होणार आहेत . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर