शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
"I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
5
बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
6
नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
7
Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
8
Aquarius Yearly Horoscope 2026: कुंभ राशीसाठी नवीन वर्ष 2026: आर्थिक चणचण संपणार! प्रवासातून भाग्योदय आणि सुखद बातम्यांचे वर्ष
9
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
10
वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
11
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
12
NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
13
दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
14
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
15
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
16
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
17
चहा १० रुपये, वडापाव २० रुपये! विमानतळावर आता मिळणार रेल्वे दरात नाश्ता; कसा घ्यायचा लाभ?
18
मुंबईत मनसेमध्ये बंडखोरी, नाराज अनिशा माजगावकर यांनी प्रभाग क्र. ११४ मधून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज 
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स
20
"धमक्या मिळाल्या आणि..." आमिर खानबद्दल भाचा इमरान खानचा खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमधील आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी जागरूक नागरिकांची मोहीम

By धीरज परब | Updated: December 30, 2025 13:20 IST

Mira Bhayander Municipal Corporation Election: मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत पोलीस, पालिका आणि आचार संहिता पथक द्वारे आचार संहितेचे उल्लंघन करून भ्रष्ट मार्ग अवलंबणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असून अश्या भ्रष्ट प्रकारे निवडणुकीत निवडून येणारे नगरसेवक आणि त्यांचे नेते हे आणखी मोठे भ्रष्टाचार करतील असा संताप शहरातील जागरूक नागरिकांनी व्यक्त करत तक्रारींची मोहीम चालवली आहे.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत पोलीस, पालिका आणि आचार संहिता पथक द्वारे आचार संहितेचे उल्लंघन करून भ्रष्ट मार्ग अवलंबणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असून अश्या भ्रष्ट प्रकारे निवडणुकीत निवडून येणारे नगरसेवक आणि त्यांचे नेते हे आणखी मोठे भ्रष्टाचार करतील असा संताप शहरातील जागरूक नागरिकांनी व्यक्त करत तक्रारींची मोहीम चालवली आहे. केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगासह पोलीस व महापालिके कडे तक्रारी देऊन कारवाई न करणाऱ्या अधिकारी - कर्मचारी यांना निलंबित करा व तात्काळ आचार संहिता भंगचे गुन्हे दाखल करा अश्या ईमेल द्वारे तक्रारीची मोहीम जागरूक नागरिक मोठ्या संख्येने चालवत आहेत.

मिरा भाईंदर शहरात विविध राजकीय पक्ष व नेते, माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवार हे उघडपणे तसेहच संस्थांच्या आड मतदारांना विविध प्रकारे लाच, प्रलोभन देत आहेत.   हळदी-कुंकू कार्यक्रमांच्या नावाखाली मतदारांना भेटवस्तू व कुपन वाटप करीत आहेत. धार्मिक स्थळी बस ने सहली आयोजित करत आहेत. विविध सोसायटी - गट, जातीय व धार्मिक, प्रांत आणि भाषा निहाय कार्यक्रम आयोजित करत आहेत.

आरोग्य आदी विविध शिबीर भरवत आहेत. ह्या अश्या विविध माध्यमातून मतदारांना उघडपणे भ्रष्ट मार्गाने मते मिळवण्यासाठी भुलवले जात आहे. महापालिकेच्या निधीतून चालणाऱ्या विकास कामांच्या ठिकाणी जाऊन सदर कामे ते करत असल्याचे मतदारांना भासवून त्याची प्रसिद्धी करत मतांसाठी गैरवापर करत आहेत.

आचार संहिता असताना वनमंत्री गणेश नाईक यांनी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात आमदार, माजी नगरसेवक - इच्छुक उमेदवार यांना सोबत नेऊन भाईंदर येथील बिबट्याच्या हल्ल्यात जखमींना शासकीय निधीतील धनादेश वाटप केले. त्याची संबंधित पक्षचे राजकीय लाभासाठी प्रसिद्धी करून घेतली. बंदरे व मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी भाईंदरच्या उत्तन येथील राजकीय प्रचार सभेत व्यासपीठावर मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त दिनेश पाटील यांना बसवून उपस्थित मच्छीमाराना प्रभावित केले आदी अनेक तक्रारींचे मुद्दे नमूद केले आहेत.

मिरा भाईंदरमधील मोठ्या प्रमाणावरील आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होत असताना पोलीस आणि पालिका तसेच आचार संहिता पथके आदी ते रोखण्यासाठी काही करत नाहीच. उलट राजकारणी यांना  उल्लंघन करण्यास मोकळे रान केले आहे. भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचे सबळ इलेक्ट्रॉनिक पुरावे असताना देखील पोलीस आणि पालिका, आचार संहिता पथके कारवाई करत नाही आणि गुन्हे दाखल न करता भ्रष्टाचारास संरक्षण देत आहेत असे गंभीर आरोप केले आहेत.

सबळ पुराव्यांसह केलेल्या तक्रारींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत दोषी सर्व शासकीय व निवडणूक अधिकाऱ्यांचे निलंबन व शिस्तभंगची कारवाई करावी व निवडणूक कामकाजातून दूर करावे. स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी आदेशित करावी. निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता पुनर्स्थापित करण्यासाठी कठोर निर्देश द्यावेत अशी मागणी तक्रारीत केली आहे. अशा उघड भ्रष्ट प्रकारांना निवडणुकीत मोकळे रान दिले गेल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया दूषित झाली असून निवडणूक आयोगाने तातडीने व कठोर हस्तक्षेप करावा अशी विनंती नागरिकांनी केली आहे.

मीरा भाईंदर महापालिकेत येणारे नगरसेवक व पक्ष हे भ्रष्ट मार्गाने निवडणून आलेले नसावे यासाठी जागरूक नागरिकांनी हि मोहीम राबवत तक्रारीची लिंक बनवून जास्तीत जास्त तक्रारी करण्यासाठी आवाहन केले जात आहे. सोशल मीडियावर कार्यरत जेम्स ऑफ मीरा भाईंदर ग्रुप, सत्यकाम फाउंडेशनचे ॲड कृष्णा गुप्ता आदींसह अनेक जागरूक नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mira Bhayandar Citizens Campaign Against Election Code Violations

Web Summary : Citizens launch campaign against code violations in Mira Bhayandar municipal elections, alleging bribery and inaction by authorities. They demand suspension of officials and investigation into corrupt practices to restore election integrity.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६