शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा - भाईंदरच्या मुख्य रस्त्याचे होणार पूर्ण डांबरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:19 IST

पॅचवर्कमुळे झाली होती दुरवस्था; गीता जैन यांच्याकडून पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कमीरा रोड : स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते काशीमीरा नाका पर्यंतच्या छत्रपती शिवाजी महाराज मार्ग या मीरा- भाईंदर शहराच्या मुख्य रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरणाचे काम एमएमआरडीए करून देणार आहे . आमदार गीता जैन यांच्या पाठपुराव्याने १८ वर्षांनी पहिल्यांदाच या रस्त्याचे पूर्णपणे डांबरीकरण होणार आहे.२००२ मध्ये शहराच्या या मुख्य रस्त्याचे काम सुरु झाले होते. याच रस्त्यातून मुख्य जलवाहिनी ही टाकली आहे . गेल्या १८ वर्षात विविध कारणांनी या रस्त्यावर खोदकाम केले. पॅचवर्कमुळे रस्त्यात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यातही खड्डे पडल्यावर पॅचवर्कचे काम केेले जाते. कोट्यवधी खर्चूनही पॅचवर्क टिकत नाही असा अनुभव आहे.सततच्या पॅचवर्कमुळे मुख्य रस्त्याचा समतोलच राहिलेला नाही. सध्या येथे मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रो मार्गासह उन्नत रस्ताही बांधला जाणार आहे. मेट्रोच्या कामाच्या अनुषंगाने रस्त्याचे काम पूर्णत्वास जाण्यास कालावधी लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्याआधी हा रस्ता पूर्णपणे डांबरीकरण करून सुस्थितीत आणावा म्हणून आमदार गीता जैन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने एमएमआरडीएने काशिमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून गोल्डन नेस्टच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौकापर्यंतच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास मंजुरी दिली आहे. या कामाचे भूमिपूजन जैन यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी शिवसेना गटनेत्या नीलम ढवण, नगरसेवक राजू भोईर, धनेश पाटील आदी उपस्थित होते.