शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर भाजप जिल्हाध्यक्षांना मानत नाही; मेहता समर्थक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 23:53 IST

मेहतांच्या कंपनीच्या गाळ्यातील कार्यालय हे जिल्हा कार्यालय म्हणून सुरूच राहील आणि म्हात्रे यांना जिल्हाध्यक्ष मानतच नाही, अशी भूमिका मेहता समर्थकांनी घेतली आहे.

मीरा राेड : राजकारण सोडल्याचे सांगणारे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजपवर वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलेल्या भाजपच्या नव्या जिल्हा कार्यालयाविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. मेहतांच्या कंपनीच्या गाळ्यातील कार्यालय हे जिल्हा कार्यालय म्हणून सुरूच राहील आणि म्हात्रे यांना जिल्हाध्यक्ष मानतच नाही, अशी भूमिका मेहता समर्थकांनी घेतली आहे.मेहतांनी रविवारी रात्री एका सभागृहात समर्थकांची सभाही घेतली. पालिका व पक्षात मेहता सक्रिय असून, त्यांच्या हस्तक्षेपाविरोधात भाजपचे अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी मेहता हटाव, शहर-भाजप बचाव, अशी भूमिका घेतली आहे. त्याविराेधात मेहता व त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यातूनच भाजपचे सेव्हन स्क्वेअर शाळेबाहेरील मेहतांच्या ७११ कंपनीच्या गाळ्यात असलेले भाजप जिल्हा कार्यालयाऐवजी स्वतंत्र वेगळे जिल्हा कार्यालय सुरू करण्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी घेतल्याने मेहता व समर्थकांत खळबळ उडाली आहे. या कार्यालयाचे उद्घाटन होऊ नये, तसेच जिल्हाध्यक्ष हटावसाठी मेहता यांच्या नेतृत्वाखाली समर्थकांनी मध्यरात्री आमदार रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली हाेती. मात्र, भाईंदर पश्चिम येथील या नव्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यामुळे मेहता समर्थकांना नाइलाजाने हजर राहावे लागले हाेते. दरम्यान, रविवारी मेहता यांच्या नेतृत्वाखाली समर्थकांची बैठक झाली. बैठकीत मेहतांच्या कंपनीच्या मालकी जागेतील कार्यालय हे भाजपचे जिल्हा कार्यालय राहील. नवघर भाजप मंडळ अध्यक्ष मधुसूदन पुरोहित म्हणाले की,  मेहता यांच्या उपस्थितीत बैठक झाली; पण ती पक्ष संघटनेबाबत होती. याव्यतिरिक्त मी काही बोलणार नाही.क्लिपमुळे खळबळमेहता समर्थक यशवंत ऊर्फ अण्णा आशीनकर यांची ऑडिओ क्लिप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्षांसोबतच्या संभाषणाच्या त्या क्लिपमध्ये आम्ही हेमंत म्हात्रेंना जिल्हाध्यक्ष मानत नाही, असे सांगतानाच आशीनकर यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून तुमचे नाव ठेवू? की नको ठेवू? असे म्हटले आहे. भाजपमध्ये दोन गट झाले असून, रविवारी झालेल्या बैठकीला २००-२२५ जण उपस्थित हाेते, असे आशीनकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :BJPभाजपा