शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदर महापालिकेची चेना शाळा होणार डिजिटल, बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना होणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 04:04 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेची चेना मराठी शाळा क्र. १० लवकरच डिजिटल होणार आहे. त्यामुळे बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळण्यास सुरुवात होणार आहे.

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेची चेना मराठी शाळा क्र. १० लवकरच डिजिटल होणार आहे. त्यामुळे बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळण्यास सुरुवात होणार आहे.पालिकेच्या विविध माध्यमांच्या ३५ शाळा आहेत. या शाळांचा शैक्षणिक दर्जा खाजगी शाळांच्या तुलनेत सुमार असल्याचा आरोप सर्वच स्तरातुन केला जातो. त्यामुळे पालिकेने खाजगी शाळांतील दर्जेदार शिक्षण गरीब व गरजु विद्यार्थ्यांना मोफत मिळावे, यासाठी या शाळांना व्यावसायिक ऐवजी ५० टक्के निवासी कर आकारण्यास सुरुवात केली. त्यातून २५ टक्के जागा त्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याचा आदेश काढण्यात आला. त्याची ठोस अंमलबजावणी होत नाही. परिणामी, त्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या शाळेखेरीज पर्याय नसल्याने नववीनंतरचे शिक्षणही बेभरवशी राहते. कारण पालिकेच्या शाळा आठवीपर्यंतच आहेत.पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांसह गणवेशाचे मोफत वाटप करते. परंतु, शिक्षणाचा दर्जा खाजगी शाळांच्या तुलनेत वाढत नसल्याने सध्या डिजिटल होत असलेल्या खाजगी शाळांप्रमाणेच पालिका शाळासुद्धा डिजिटल करण्याचा प्रयत्न एक वर्षापूर्वी सुरु झाला. त्याला नुकतेच यश आल्याने डिजिटल शाळेसाठी सुरुवातीला चेना मराठी शाळेची निवड करण्यात आली आहे. ही शाळा शहराच्या वेशीवर तसेच संजय गांधी राष्टÑीय उद्यानाला लागून असल्याने या शाळेत बहुतांशी आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेतात. पहिली ते आठवीपर्यंत २४१ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणासाठी एक बोर्ड देण्यात येणार आहे.भूगोल, इतिहास, विज्ञान, सांस्कृतिकतेचे सचित्र ज्ञान मिळावे, यासाठी शाळेत २१ संगणक बसविण्यात येणार असून सुसज्ज लायब्ररी असेल.डिजिटल शिक्षणाला चेना मराठी शाळेपासुन सुरुवात होणार असली, तरी पालिकेच्या उरलेल्या शाळांतही ते लवकरच सुरु केले जाणार आहे. खाजगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे.- दीपक पुजारी, उपायुक्त पालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रमुख.डिजिटल शिक्षणासाठी चेना मराठी शाळेची निवड झाल्याने विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण मिळण्यास सुरुवात होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांत आनंदाचे वातावरण आहे.- विश्वास हिरे, चेना शाळेचे मुख्याध्यापक

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर