शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भार्इंदर - आजच्या महासभेत आरोपांच्या फैरीत सापडलेल्या प्रारूप विकास आराखडयाच्या विषयावर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 13:41 IST

मीरा भार्इंदर शहराच्या सुधारीत प्रारुप विकास आराखडा फुटी प्रकरणासह विरोधकांना टार्गेट करतानाच अर्थपुर्ण आरक्षणं टाकणे आदी आरोप होत असतानाच माहापौरांनी आजच्या विशेष महासभेत विकास आराखड्याबाबत विचार विनीमय करुन निर्णय घेण्याचा प्रस्ताव आणला.

मीरारोड - मीरा भार्इंदर शहराच्या सुधारीत प्रारुप विकास आराखडा फुटी प्रकरणासह विरोधकांना टार्गेट करतानाच अर्थपुर्ण आरक्षणं टाकणे आदी आरोप होत असतानाच माहापौरांनी आजच्या विशेष महासभेत विकास आराखड्याबाबत विचार विनीमय करुन निर्णय घेण्याचा प्रस्ताव आणला. महापालिका आयुक्त बी.जी.पवार यांनी मात्र महापौरांनी घेतलेल्या विषयाचा गोषवारा प्रशासना मार्फत दिला नसल्याचे स्पष्ट करत आराखड्या बद्दल सविस्तर अहवाल सादर केला आहे. गंभीरबाब म्हणजे आराखडा जाहीर करण्याची मुदत डिसेंबर २०१६ मध्येच संपली असल्याने त्याची मुदतवाढ शासनाकडून मंजुर नसताना तो प्रसिध्द करणे वा चर्चा करणे नियमात बसेल का ? असा प्रश्न केला जात आहे.मीरा भार्इंदर शहराची विकास योजना ही १९९७ मध्ये मंजूर झाल्यावर त्याची मुदत २० वर्षा करीता होती. आधीच्या आराखड्याची मुदत डिसेंबर २०१७ मध्ये संपुष्टात आली. तर शहराचा सुधारीत प्रारुप आराखडयाचा इरादा जाहीर करण्यास ऑक्टोबर २०१५ मध्ये महासभेने मंजुरी दिल्या नंतर मार्च २०१६ मध्ये नगररचना अधिकारी म्हणून तत्कालिन नगररचनाकार यांची नियुक्ती करण्यात आली होती.शहराचा विद्यमान जमीन वापर नकाशा हा नगररचना अधिकारी यांनी जुन २०१६ मध्ये आयुक्तांना सादर केला होता.जमीन वापर नकाशा हा दोन वर्षात प्रसिध्द होणे आवश्यक होते. अन्यथा महासभेपुढे विषय घेऊन त्याला मुदतवाढीचा ठराव करुन तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवायचा असतो. मुळ मुदती नंतर जास्ती जास्त एक वर्षाची मुदतच अनुदनेय होवू शकते .दरम्यान घेवारे यांची बदली पुणे येथे झाल्याने नगररचना अधिकारी नेमण्यातच आला नाही. त्यातही सुधारीत विकास योजना २६ डिसेंबर २०१६ पर्यंत प्रसिध्द करणे आवश्यक होते. परंतु आजतागायत महासभेने त्यास मुदतवाढ दिलेली नसल्याने साहजिकच शासना कडुन देखील त्यास मंजुरी मिळु शकलेली नाही.प्रारुप विकास योजने बाबत आधी पासुनच त्यावर राजकिय प्रभावाची चर्चा रंगली होती. मनमर्जी नुसार दिलेल्या निर्देशांप्रमाणे प्रारुप आराखडा तयार केल्याचे आरोप होऊन तशा तक्रारी देखील झाल्या. तत्कालिन आयुक्त डॉ. नरेश गीते यांना सत्ताधारी भाजपा कडुन टार्गेट करण्या मागे देखील आयुक्तांनी सुधारीत योजनेची फेरपडताळणी करण्याचा पावित्रा घेतल्याचे प्रमुख कारण बोलले जाते.नुकतेच ५ फेब्रुवारी रोजी आयुक्तांच्या मान्यतेने तत्कालिन नगररचनाकार यांना पत्र पाठवुन त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेली कार्यवाही, अहवाल व नकाशे आदी पालिकेच्या स्वाधीन करण्याचे कळवले होते.त्या अनुषंगाने घेवारे यांनी ७ फेब्रुवारी रोजीच आपल्याकडील कागदपत्रं, अहवाल, नकाशे आदी दोन बंद लिफाफ्यांमधुन सादर केले होते. त्यातील नकाशांचा लिफाफा बंद ठेऊन दुसरा गोपनीय पत्रांचा लिफाफा १४ फेब्रूवारी रोजी आयुक्त बी.जी.पवार, सहआयुक्त माधव कुसेकर, सहाय्यक संचालक नगररचना देशमुख आदींच्या उपस्थितीत उघडण्यात आला होता.त्यातील पत्रात घेवारे यांनी प्रारुप विकास योजने बद्दलचा तपशीलवार मसुदा नमुद करतानाच आपली बदली झाली असल्याने नविन नगररचना अधिकारी नियुक्त करण्याची विनंती केली आहे.

परंतु १० ऑक्टोबर २०१७ रोजीच घेवारे यांना पालिका सेवेतुन कार्यमुक्त करण्यात आले असल्याने नविन नगररचना अधिकारी नियुक्त करण्यासह सुधारीत विकास योजना नकाशा प्रसिध्द करण्यासह पुढिल कार्यवाही करण्या बाबत कोकण विभागीय नगररचना संचालक यांच्या कडे १४ फेब्रूवारी रोजीच मार्गदर्शन मिळावे म्हणुन प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. पण त्या बद्दलचे मार्गदर्शन अजुन मिळालेले नसल्याचे आयुक्तांनी विशेष महासभेस दिलेल्या अहवालात नमुद केले आहे.आधीच आराखडा अद्याप जाहिर झालेला नसतानाच गेल्या काही दिवसां पासुन कथीत आराखड्यातील मुर्धा व राई गाव तसेच मागील परिसराचा नकाशा सोशल मिडीयावर व्हायरल झाला. हेमंत पवार या नागरीकाने त्या नकाशाचा हवाला देत एकाने आपल्या बहिणीच्या जमीनीत आरक्षण टाकल्याचे नकाशा दाखवत सांगीतले होते. आरक्षण काढण्यासाठी ५ -६ लाखांचा खर्च करा अन्यथा जमीन मिळेल त्या भावाने विकुन टाका सांगत गिरहाईक देखील लावण्यात आले. तर माजी नगरसेवक रोहित सुवर्णा तर आखारखडा फुटी मागे अब्जावधी रुपयांचा घोटाळा असुन त्याची सखोल चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यां पर्यंत केली होती. माजी महापौर गीता जैन यांनी देखील शहर हिताच्या आराखाड्याचा वापर व्यक्तीगत स्वार्थ साधण्यासह विरोधकांना टार्गेट करण्यासाठी होत असल्याचा संशय व्यक्त केला होता. प्रदिप जंगम आदींनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

त्यामुळे मंगळवारी होणारया विशेष महासभेत या विषयावर सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्षातील शिवसेना व काँग्रेसचे नगरसेवक काय भुमिका घेतात या कडे अनेकांचे लक्ष लागले आहे.