शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलेही उतरली प्रचारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 23:59 IST

१०० रुपये रोज : कामगार नाके पडले ओस

चिकणघर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. विविध राजकीय पक्षांच्या रॅलीमध्ये नाका कामगार गुंतल्याने कल्याणमधील कामगार नाके मागील आठवड्यापासून ओस पडू लागले आहेत. किरकोळ कामासाठीही नाक्यावर मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे कल्याणमधील बांधकामांवरही परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे, प्रचारात अल्पवयीन मुलेही दिसत असून, त्यांना दिवसाला १०० रुपये रोज दिला जात आहे.२१ आॅक्टोबरला मतदान असल्याने शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी रॅलींवर भर दिला आहे. त्यासाठी लागणारी माणसे चक्क कामगार नाक्यावरून आणली जात आहेत. महिलांना ३०० आणि पुरु षांना ५००, तर अल्पवयीन मुलांना १०० रु पये दिले जात आहेत. त्याचबरोबर त्यांना सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि सायंकाळीही जेवणाचे पाकीट दिले जात आहे.काही उमेदवारांनी तर अंतिम यादी जाहीर झाल्यापासून प्रचाराच्या १२ दिवसांसाठी मजूर आधीच बुक करून ठेवले आहेत. सकाळी आणि सायंकाळी उमेदवाराबरोबरच प्रचार करणे आणि इतर वेळी कार्यकर्त्यांबरोबर गर्दी करण्यासाठी घरोघरी फिरणे, यासाठी ३०० ते ५०० रु पये मिळत आहेत.शिवाय, दिवसभरात सकाळ, दुपार आणि सायंकाळी, अशा तिन्ही वेळा जेवणाचीही व्यवस्था होत असल्यामुळे मजूर नाक्यावर न जाता थेट उमेदवार सांगेल तेथे अथवा त्याच्या कार्यालयात हजर होतात. यामुळे प्रचार संपेपर्यंत तरी कामगार नाके पुन्हा मजुरांनी गजबजणार नाहीत.नाक्यावर रोज काम मिळत नाही. कधीकधी परत जावे लागते. पण, निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून रोज कुठेना कुठे प्रचारात फिरायचे काम मिळत आहे. पैसेही मिळतात आणि जेवणही मिळते. आम्हाला पक्षापेक्षा केवळ मजुरी महत्त्वाची आहे.- विजय वाघमारे, दत्तू पवारनिवडणुकीआधीच आमच्याशी माणसांसाठी संपर्क केला जातो. ज्याच्यात्याच्या मागणीप्रमाणे आम्ही मजूर पुरवतो. यावेळी काही ठिकाणी १००, २०० अशी एकगठ्ठा मजुरांची मागणी होती.- नानासाहेब सोमवंशी, मजूर कंत्राटदार, कल्याण