शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 00:53 IST

उच्चभ्रू गृहसंकुलातील रहिवाशांकडून कुटुंबाला देण्यात येणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून १२ वर्षांच्या मुलीने आत्महत्येचा

कल्याण : उच्चभ्रू गृहसंकुलातील रहिवाशांकडून कुटुंबाला देण्यात येणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून १२ वर्षांच्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना पश्चिमेत घडली आहे. या मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे सोसायटीतील काही महिलांनी या मुलीच्या वडिलांवर छेडछाड करत असल्याचा आरोप करत खडकपाडा पोलिसात तक्रार दिली आहे.आधारवाडी परिसरात साकेत पॅरेडाइज सोसायटीत एक कुटुंब काही वर्षांपासून राहत आहे. त्यांच्या मुलीने सोमवारी सायंकाळी विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या मुलीचा आरोप आहे की, गेल्या काही महिन्यांपासून सोसायटीतील काही महिला टोमणे मारून तिचा मानसिक छळ करत आहेत. याप्रकरणी तिचे वडील म्हणाले की, सोसायटीतील गैरप्रकार मी इतर सदस्यांपुढे मांडत असतो. याच कारणांमुळे काही दिवसांपासून माझ्या मुलीला काही महिला मानसिक त्रास देत होत्या. यासंदर्भात मी आणि माझ्या मुलीने खडकपाडा पोलिसात तक्रार दिली होती. याच रागापोटी सोसायटीमधील काही महिलांनी माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ठोस कारवाई करून मला तसेच माझ्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा. सोसायटीचे सचिव भागवत पाटील म्हणाले, ‘घडलेल्या प्रकाराचा पोलीस तपास करत आहेत. त्यानंतरच सत्य समोर येईल.’