शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ मौजमजेसाठी स्कूटर चोरणारा निघाला अल्पवयीन मुलगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 21:08 IST

केवळ मौजमजेसाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन चोरटयाला वर्तकनगर पोलिसांनी मोठया कौशल्याने ताब्यात घेतले आहे. त्याला भिवंडी न्यायालयाने १५ दिवस भिवंडी येथील बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देवर्तकनगर पोलिसांची कामगिरी आठ मोटारसायकलींसह दोन मोबाईल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: केवळ मौजमजेसाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन चोरटयाला वर्तकनगर पोलिसांनी मोठया कौशल्याने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून आठ मोटारसायकली आणि दोन मोबाईल जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी सोमवारी दिली.वर्तकनगर भागात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हणमंत क्षिरसागर, जमादार एस. के. यादव आणि महिला पोलीस नाईक अरुणा वामन आदींच्या पथकाने बदलापूर स्कायवॉक येथे २८ फेब्रुवारी २०२१ रोजी या अल्पवयीन चोरटयाला ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्याचा पाठपुरावा केला होता. एखादी स्कूटर चोरल्यानंतर तो तीन ते चार दिवस फिरवायचा. त्यानंतर ती दुचाकी कुठेही सोडून तो पसार होत होता. त्याच्याकडून वर्तकनगर येथील दोन, विष्णुनगर, नारपोली, राबोडी, बदलापूर, ठाणेनगर आणि मानपाडा येथील प्रत्येकी एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड झाला असून वर्तकनगर येथील दोन मोबाईल चोरीचेही गुन्हे उघड झाले आहेत. त्याला भिवंडी न्यायालयाने १५ दिवस भिवंडी येथील बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटक