शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमधून बेपत्ता झालेला अल्पवयीन मुलगा सहा वर्षांनी अहमदनगरमध्ये मिळाला

By जितेंद्र कालेकर | Updated: December 19, 2020 00:37 IST

अंबरनाथ येथील घरातून निघून गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा अहमदनगर येथून शोध घेण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला यश आले आहे. आपला मुलगा सुखरुप मिळाल्याने त्याच्या पालकांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कामगिरी वडिल रागावल्याने झाला होता पसार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वडिल रागावल्यामुळे अंबरनाथ येथील घरातून निघून गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा अहमदनगर येथून शोध घेण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला यश आले आहे. त्याला शुक्रवारी सुखरुपपणे पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.संजयकुमार विश्वकर्मा या १७ वर्षीय मुलाच्या अपहरणाची तक्रार २०१४ मध्ये अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे २०१७ मध्ये सोपविण्यात आला होता. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग, उपनिरीक्षक सुनिल चव्हाणके आणि पोलीस हवालदार प्रविण दिवाळे यांनी अथक मेहनत घेऊन तांत्रिक माहितीद्वारे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा तो अहमदनगर जिल्हयातील कर्जत येथील थोटेवाडी येथे मजूरीचे काम करीत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे चव्हाणके यांच्या पथकाने अहमदनगर येथून १६ डिसेंबर २०२० रोजी त्याला ताब्यात घेतले. त्याची व्हिडिओ कॉलिंगद्वारे उत्तरप्रदेशात कामानिमित्त गेलेल्या त्याच्या वडिलांशी या पथकाने ओळख पटवून खात्री केली. तो आपलाच मुलगा असल्याचे त्याच्या वडिलांनी या पथकाला सांगितले. क्षुल्लक कारणावरुन रागावल्याने त्याने घर सोडल्याची माहिती त्याच्या चौकशीमध्ये समोर आली. थोटेवाडी येथे त्याच्या वर्णनाशी मिळता जुळता एक मुलगा असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने त्याचा शोध घेतला.* आवाज बारीक असल्यामुळे गोंधळसंजयकुमार याचा आवाज त्याच्या वयाच्या मानाने कमी होता. त्यामुळे त्याच्या फोनवरील आवाजातून तो नसावा, अशी शक्यता होती. परंतू, प्रत्यक्षात थोटेवाडी गाठल्यानंतर मात्र तो संजयकुमार असल्याची खात्री पटल्याचे कडलग यांनी सांगितले. आपला मुलगा सुखरुप मिळाल्याने त्याच्या पालकांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं