शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

मुंबईच्या नाल्यांची घाण मीरा-भार्इंदरमध्ये

By admin | Updated: May 6, 2016 00:57 IST

मुंबईतील नालेसफाई सुरु झाली आहे. काढलेला गाळ मिरा-भार्इंदरमधील घोडबंदर, वसई-विरारमधील ससूनवघर व मालजीपाडा परिसरातील तिवर व पाणथळ क्षेत्रात टाकली जात आहे.

भार्इंदर : मुंबईतील नालेसफाई सुरु झाली आहे. काढलेला गाळ मिरा-भार्इंदरमधील घोडबंदर, वसई-विरारमधील ससूनवघर व मालजीपाडा परिसरातील तिवर व पाणथळ क्षेत्रात टाकली जात आहे. ही घाण वाहून आणणारे डंपर घोडबंदर गावातील रस्त्यावरच उभे केले जात असल्याने तेथे वाहतूक कोंडी होते. डंपरमधील घाणीच्या दुर्गंधीमुळे घोडबंदरकर त्रस्त झाले आहेत. मिरा-भार्इंदरमधील तिवरसह पाणथळ क्षेत्रात मुंबईतील बांधकामाचे साहित्य (डेब्रिस) मोठ्या प्रमाणात टाकला जात असला तरी महसूल विभाग, पालिका प्रशासन व पोलिस कोणतीही कारवाई करत नाहीत. यामुळे या क्षेत्रात खुलेआम मातीचा भराव टाकून अनेक ठिकाणी बेकायदा बांधकामेही केली आहेत. यावर कारवाईचे आदेश आल्यानंतरच त्या बांधकामांवर थातूरमातूर कारवाई केली जाते. शहरातील बुहतांश तिवरक्षेत्र घोडबंदर व वसई-विरारमधील ससूनवघर, मालजीपाडा परिसरात असल्याने तेथे मातीचा भराव टाकला जातो. यावर महसूल विभाग केवळ कागदी घोडे नाचवून कारवाईचे सोपस्कार पार पाडतात.डेब्रिजनंतर मुंबईत सध्या सुरु झालेल्या नालेसफाईची घाण घोडबंदरसह ससूनवघर व मालजीपाडा परिसरातील तिवर व पाणथळ क्षेत्रात टाकली जात आहे. त्यासाठी दिवसभर घाण वाहून आणणारे डंपर घोडबंदर गावातील रस्त्यावरच उभे केले जातात. त्यामुळे येथील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन दुर्गंधी परिसरात पसरत आहे. यामुळे तेथील रहिवाशी दुर्गंधीमुळे त्रस्त झाले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे दोन्ही पालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन डोळेझाक करीत आहेत. पर्यावरण विभाग तिवरक्षेत्रातील लोकाभिमुख विकासाला मनाई करते. परंतु, याच क्षेत्रातील बेकायदा प्रकार नजरेआड करीत असल्याचा आरोप घोडबंदरकरांनी केला आहे. मुंबईतील घाण आमच्या हद्दीत नको, तेथील जागेत होणारा भराव त्वरित थांबवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.(प्रतिनिधी)चौकशी केली जाईल : प्रभाग अधिकारी वासुदेव शिरवळकर म्हणाले, डंपरमुळे वाहतूक कोंडी झाल्याने ती वाहतूक शाखेच्या मदतीने सुरळीत करण्यात आली. त्या डंपरमधील घाण मीरा-भार्इंदर हद्दीत टाकली जात नाही. तरीदेखील त्याची चौकशी केली जाईल.