मुंब्रा : मानवी आरोग्यास हानिकारक असलेली गावठी दारू आणि ती बनवण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, असा तब्बल आठ लाख २१ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि शीळ-डायघर पोलिसांनी देसाई गावाजवळील खाडी आणि जंगलामध्ये तयार करण्यात येणाऱ्या हातभट्ट्यांवर ही संयुक्त कारवाई केली. या कारवाईत दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या ४४ हजार रु पयांच्या चुली, दारू तयार करण्यासाठी वापरण्याची येणारे दोन लाख ३२ हजार ५०० रु पयांचे रसायन तसेच १५५ प्लास्टिकचे पिंप आणि पाच लाख ४४ हजार रु पयांची दारू ताब्यात घेतली. याप्रकरणी १२ जणांविरोधात शीळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)
लाखो रुपयांची गावठी दारू जप्त
By admin | Updated: November 17, 2016 07:00 IST