शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

बालकांना विकणारी टोळी जेरबंद! ६ महिलांचा समावेश, दोन बालकांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 05:00 IST

गोर-गरीब महिलांना नको असलेली नवजात बालके श्रीमंतांना विकणा-या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला. या प्रकरणी सहा महिलांसह आठ आरोपींना अटक करून त्यांच्या तावडीतून दोन बालकांची सुटका केली आहे.

ठाणे : गोर-गरीब महिलांना नको असलेली नवजात बालके श्रीमंतांना विकणा-या टोळीचा पर्दाफाश ठाणे पोलिसांनी केला. या प्रकरणी सहा महिलांसह आठ आरोपींना अटक करून त्यांच्या तावडीतून दोन बालकांची सुटका केली आहे.अनैतिक संबंध किंवा अत्याचारातून जन्माला आलेले बाळ संबंधित महिलेला विकायचे असल्यास, त्याची व्यवस्था करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींवर काही दिवस पाळत ठेवली. चौकशी केली असता सोलापूर येथील राखी रणधीर बाबरे ही या टोळीची सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या महिलेने गरजू महिला हेरण्यासाठी झोपडपट्टी भागांमध्ये हस्तक नेमले होते. तसेच राखी बाबरे ही स्वत: यासाठी कंत्राटी पद्धतीने मातृत्व (सरोगसी) स्वीकारत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. तसेच गरजू शोधण्यासाठी सरोगसीवर उपचार करणाºया हॉस्पिटल्समध्येही आरोपीने हस्तक तयार केले होते.पोलिसांनी या प्रकरणी राखीसह हरजिंदर धरमसिंग गिल, कावेरी राज दास, नीलम अनिल सिरसाट, मोहिनी किरण गायकवाड, जनाबाई शेषराव खोतकर, मंगल बाळासाहेबसुपेकर आणि संतोष रामदास गायकवाड यांना अटक केली. तरएक आणि सहा महिन्यांचीदोन नवजात बालके विकण्याच्या तयारीत आरोपी असताना पोलिसांनी कारवाई केली. दोन्ही बालकांची व्यवस्था नेरूळ येथील बालसुधारगृहात केली आहे. आरोपींना ३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सावत्र मुलाकडून अत्याचारआरोपींपैकी एका महिलेवर सावत्र मुलाकडून अत्याचार करण्यात आला होता. यातून जन्माला आलेल्या बाळालाही विकण्याचा प्रयत्न आरोपीने केला. या टोळीमध्ये आणखी आरोपी असून, चौकशीअंती त्यांनाही अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.अशी होती कार्यपद्धतनवजात बालक एखाद्या महिलेला नको असल्यास, तिच्याशी संपर्क साधून पैशाचे आमिष दाखविण्याचे काम हे हस्तक करायचे. बालक विकण्यास महिला तयार झाली की, ते विकत घेणारा शोधून ही महिला मोठ्या प्रमाणात पैसे कमवित असल्याची माहिती तपासामध्ये समोर आले. बालकांची विक्री २ ते ५ लाख रुपयांमध्ये केली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हा