शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीवरून जात असलेल्या मायलेकीला ट्रकची धडक, तरुणीला गमवावा लागला पाय

By पंकज पाटील | Updated: March 22, 2024 17:02 IST

मनाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघातात दोघींचा जीव बचावला असला तरी तरुणीला पाय गमवावा लागला आहे. 

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. पूर्वेच्या समर्थ चौकात मालवाहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे ट्रॅकवरील नियंत्र सुटले आणि हा भरधाव वेगातील ट्रक दुचाकीवरून जाणाऱ्या मायलेकींना धडकला. मनाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघातात दोघींचा जीव बचावला असला तरी तरुणीला पाय गमवावा लागला आहे. 

अंबरनाथ स्वामी समर्थ चौक हा नेहमीच वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहे. या ठिकाणी शिवमंदिराच्या दिशेने तीव्र उतार असल्यामुळे त्या चौकात वाहनांवर नियंत्रण मिळवणे अवघड जाते. त्यातच एका मालमहू ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने तो दुचाकीला धडकला. या भीषण अपघातात वीस वर्षीय सिनिग्धा असलेकर या तरुणीच्या पायावरून ट्रकव्हे चाक गेल्याने तिचा पाय पूर्णपणे निकामी झाला आहे. तर दुचाकीवर मागे बसलेली तिची आई (५२) प्रतिपदा असलेकर यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघात स्थळी असलेल्या समर्थ चौकातून हा नियंत्रण सुटलेला ट्र्क दुचाकीवाहनाला फरपटत गोविंद पुलापर्यंत घेऊन गेला. 

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून दोन्ही जखमींना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता त्यांना पुढील उपचारासाठी ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- ज्या क्षणाला हा अपघात घडला त्यावेळेस तीन ते चार दिवसाची आजूबाजूला होत्या मात्र ट्रक रॉंग साईडने आल्याने या मायलेकींना ट्रकचा अंदाज आला नाही आणि त्या ट्रक खाली गेल्या. - नेमका ट्रकचा ब्रेक फेल झाला होता की नाही याबाबत अद्यापही पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नसली तरी ट्रकच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. - ट्रक अनियंत्रित होत असल्याचे लक्षात येताच ट्रकचा क्लिनर याने अपघातानंतर लागलीच चालत्या ट्रक मधून उडी मारून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.  

टॅग्स :Accidentअपघातambernathअंबरनाथ