शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

स्थलांतरामध्ये सत्तासंघर्ष, शिवसेना-भाजपचा सामना सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 04:42 IST

शिधावाटप कार्यालय:राज्यमंत्र्यांवर कार्यक्रम रद्द करण्याची ओढावली नामुश्की

डोंबिवली : सत्ता राज्यातील असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील, शिवसेना-भाजपातील सत्तासंघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाही. कल्याण-डोंबिवलीतील राजकारणात याचा प्रत्यय रविवारी पुन्हा एकदा आला. यावेळी निमित्त होते शिकस्त इमारतीतील शिधावाटप कार्यालय पश्चिमेकडील विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीत स्थलांतर करण्याचे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या कार्यालयाचा शुभारंभ होणार होता. परंतु, कार्यालय स्थानांतरणाचा कार्यक्रम प्रत्यक्षात होऊच शकला नाही. यामागचे ठोस कारण समजू शकलेले नसले, तरी यासाठी शिवसेनेनेच आडकाठी आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यमंत्री चव्हाण यांच्यावर कार्यक्रम रद्द करण्याची नामुश्की ओढावल्याने हा संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.

पश्चिमेतील भागशाळा मैदानालगत असलेल्या शिधावाटप कार्यालयाची वास्तू जुनी झाल्याने कर्मचाऱ्यांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. दरवर्षी पावसाचे पाणीही साचत असल्याने हे कार्यालय रेल्वेस्थानकासमोरील जुन्या विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीत तळ मजल्यावर हलवण्यात येणार होते. त्याअनुषंगाने डोंबिवलीचे आमदार आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार शिधावाटप कार्यालयाचे स्थलांतर रविवारी केले जाणार होते. सकाळी ९ वाजता चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यालय उद्घाटनाचा कार्यक्रम होणार होता. परंतु, त्यांना ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करावा लागला. विशेष बाब म्हणजे या इमारतीच्या बाहेर लावलेले शिधावाटप कार्यालयाचे फलकही तेथून काढण्यात आले आहे. दरम्यान, १९८९ साली बांधण्यात आलेली विष्णुनगर पोलीस ठाण्याची इमारत दोन वर्षांपूर्वी केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे येथील विष्णुनगर पोलीस ठाण्याचे स्थानांतरण आनंदनगर येथे करण्यात आले आहे. त्यामुळे अशा धोकादायक इमारतीत शिधावाटप कार्यालय कशासाठी, असा सवाल शिवसेनेचे नगरसेवक मोरे यांनी केला होता. या हरकतीमुळेच स्थानांतरण बारगळल्याची चर्चा आहे.संबंध नाहीदरम्यान, यासंदर्भात राजेश मोरे यांच्याशी संपर्क साधला असता कार्यक्रम रद्द होण्यामागे शिवसेनेचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. कार्यालय हे धोकादायक इमारतीत हलवण्यात येणार असल्याने हरकत नोंदवली होती. महापालिकेकडे अन्य सुसज्ज अशा इमारती असून तेथे हे कार्यालय तातडीने स्थानांतरित करावे. चांगल्या जागेत कार्यालय गेल्यास कर्मचारी आणि नागरिकांना दिलासा मिळेल, असे मोरे म्हणाले.राज्यमंत्र्यांकडून प्रतिसाद नाही : कार्यालय स्थलांतराच्या शुभारंभाचा कार्यक्रम रद्द झाल्याप्रकरणी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका