शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

मध्यरेल्वेचा टिटवाळा-कसारा मार्ग ३७ तासांनी सुरू,  एकेरी मार्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:21 IST

दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर ठप्प असलेला मध्यरेल्वेचा टिटवाळा-कसारा मार्ग तब्बल ३७ तासांनी बुधवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास खुला झाला.

ठाणे : दुरांतो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर ठप्प असलेला मध्यरेल्वेचा टिटवाळा-कसारा मार्ग तब्बल ३७ तासांनी बुधवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास खुला झाला. तेथून कसा-याच्या दिशेने लोकल सोडून त्याची सुरक्षा चाचणी घेण्यात आली. सध्या कसा-याच्या दिशेने एकेरी मार्ग सुरू करण्यात आला आहे.मुंबईच्या दिशेने येणारी दुरांतो एक्स्प्रेस मंगळवारी सकाळी घसरल्याने हा मार्ग बंद होता. दिवसभरात डबे हटवण्याचे आणि नंतर रूळ टाकण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले. त्यानंतर ओव्हरहेड वायरचे काम पूर्ण झाले. वीजप्रवाहाची चाचणी घेऊन सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास लोकल सोडण्यात आली. रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा, विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी दोन दिवस तेथे तळ ठोकला असून जवळपास ३५० कामगार तेथे अहोरात्र काम करीत आहेत. आताही लोकल वाहतूक सुरू झाली असली, तरी अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी तेथून मोजक्याच फेºया होतील. नंतर त्या टप्प्याटप्प्याने वाढवत नेल्या जातील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.कल्याण ते कर्जत आणि कसारादरम्यान कोणतीही समस्या उद््भवली तरी अधिकारी पोचून ती मार्गी लागेपर्यंत खूप वेळ जातो. त्यामुळे रेल्वेच्या उपविभागीय महाव्यवस्थापकांचे कार्यालय कल्याणला हलवावे. त्यामुळे प्रश्न लवकर सुटतील, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली.

पुन्हा दरड कोसळलीपावसाच्या संततधारेने कसारा घाटात नाशिकच्या दिशेने जाणाºया मार्गात दरडी व झाडे कोसळल्याने बुधवारी सकाळी रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. जुन्या कसारा घाटात अंबा पॉईंट वळणावर सकाळी महाकाय वृक्ष व दरडी कोसळल्या. यात दोन बाइकस्वार थोडक्यात बचावले. मात्र अन्य कोणतीही हानी झाली नाही. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर दरडी हटविण्यात आल्या. हे काम सुरू असेपर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी संबंधित ठेकेदार कंपनी आणि नॅशनल हाय वे अ‍ॅथॉरिटीला नोटीस बजावली आहे.रूळांखालील माती खचल्याने दुरांतोला अपघात झाल्याने वाहतूक सुरू करण्यापूर्वी पुन्हा जमिनीची तपासणी करण्यात आली. आधी कसाºयाला जाणारी एकेरी वाहतूक सुरू होईल. नंतर दुसरा मार्ग सुरू होईल. त्यावरून ताशी ३० किमीच्या वेगाने वाहतूक सुरू राहील. लोकल वाहतूक नीट सुरू झाल्यावरच लांबपल्ल्याच्या गाड्या धावतील.अनेक गाड्या रद्ददुरांतो एक्स्प्रेसच्या अपघातामुळे बुधवारी दुसºया दिवशीही मुंबई-वाराणसी महानगरी, मुंबई-अमृतसर पठाणकोट, राजेंद्रनगर, मुंबई-नांदेड, मुंबई मनमाड, मुंबई-मनमाड, एलटीटी-मनमाड, मुंबई-नागपूर, मुंबई-नागपूर, मनमाड-मुंबई, मनमाड-मुंबई, मनमाड-एलटीटी, एलटीटी-गोहाटी, एलटीटी-गोरखपूर, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, मुंबई-हावडा गीतांजली, एलटीटी-कामाख्या, वाराणसी-एलटीटी, एलटीटी-वाराणसी, मुंबई-नांदेड, शालिमार एक्स्प्रेस, शालिमार, हावडा-मुंबई मेल, मुंबई-हावडा मेल या गाड्या रद्द करण्यात आल्या.मार्ग बदललेविदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-मुंबई, एलटीटी-पुरी, एलटीटी-राजेंद्रनगर, एलटीटी-दरभंगावेळेत बदल : पवन, काशी, गोदान, मुंबई-हावडा, पुरी-एलटीटी, भुसावळ-पुणे हुतात्मा ही गाडी मनमाड-दौंडमार्गे धावेल. मंगला एक्स्प्रेसही जळगाव,बोईसर मार्गे धावणार आहे.

टॅग्स :central railwayमध्ये रेल्वे