शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीए, म्हाडासह एमआयडीसीला कोट्यवधींच्या व्याजावर सोडावे लागणार पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 04:11 IST

एमएसआरडीसीला दिलेल्या साडेपाच हजार कोटींच्या कर्जावरील व्याजाला आता सिडको, एमएमआरडीए, म्हाडा आणि एमआयडीसीला पाणी सोडावे लागणार आहे.

नारायण जाधव ठाणे : बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी एमएसआरडीसीला दिलेल्या साडेपाच हजार कोटींच्या कर्जावरील व्याजाला आता सिडको, एमएमआरडीए, म्हाडा आणि एमआयडीसीला पाणी सोडावे लागणार आहे. भूसंपादनामुळे विहीत मुदतीत या मार्गाचे बांधकाम पूर्ण न झाल्याने आणि कोविडमुळे ते आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे एसआरडीसीची पत घसरण्याची भीती लक्षात घेऊन शासनाने उपरोक्त महामंडळांनी दिलेल्या कर्जाचे अचानक एमएसआरडीसीच्या समभागात रुपांतर केले आहे.यात सिडको, एमएमआरडीए, म्हाडा, झोपु यांचे प्रत्येकी हजार कोटी तर एमआयडीसीने दिलेल्या दीड हजार कोटी रु पये कर्जाचा समावेश आहे.शासनाने जबरदस्ती करून त्यांना कर्ज देण्यास भाग पाडून व्याज देण्याचे अमिंष दाखिवले होते. परंतु, आता त्याचे १३ आॅगस्ट २०२० रोजी एमएसआरडीसीच्या समभागात रुपांतर केल्याने या कोटयावधींच्या व्याजास उपरोक्त महामंडळांना मुकावे लागणार आहे. आठ टक्केलाभांश देण्याचे प्रलोभन दाखिवले आहेसुमारे ७१० किमीचा महामार्ग १० जिल्ह्यांतील ३८१ गावांतून जाणार आहे. त्यावर ५५ हजार ५०० कोटी रु पये खर्च होणार असून त्यातील १२ ते १६ हजार कोटी रु पये भूसंपादनासाठी लागणार आहेत.>पाचही महामंडळांचे कोट्यवधींचे नुकसानसाडेपाच हजार कोटी कर्जाचे समभागात रु पांतर करतांना त्यांना आठ टक्केलाभांश देण्याचे प्रलोभन दाखिवले आहे. मात्र लाभांश हा निव्वळ नफ्यावर मिळतो. परंतु आधीच एमएसआरडीसी तोटयात आहे. त्यातच ७७ हजार कोटींच्या समृद्धी महामार्गासाठी त्यांनी बाजारातून कर्ज घेतली आहेत. शिवाय बांद्रा-वर्सोवा सी लिंक, मुंबई-पुणे मिसिंग लिंक, भिवंडी -शीळफाटा मार्ग, वाशी खाडी पूल -३ असे महागडे प्रकल्प एमएसआरडीसीने हाती घेतले आहेत. यामुळे या महामंडळास नफा होऊन लाभांश जाहिर होणे दुरापास्त आहे. यामुळे तेल ही गेले तुपही गेले हाती धुपाटणे आले अशी गत होऊन सिडको, एमएमआरडीए, म्हाडा, झोपुसह एमआयडीसी या पाचही महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.>बँकांकडूनही घेतले हजारो कोटींचे कर्जमुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी भारतीय स्टेट बँकेकडून चार हजार कोटींचे कर्जास विशेष हेतू कंपनीस राज्य शासनाने हमी दिली आहे. या शिवाय एलआयसी अर्थात भारतीय आर्युविमा महामंडळ, कॅनरा बँक, हुडको आणि पंजाब नॅशनल बँक अशा चार वित्त संस्थाकडूनही १३ हजार कोटी कर्ज घेण्यास मान्यता दिली आहे