शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

म्हसा यात्रेला नोटाबंदीचा फटका

By admin | Updated: January 13, 2017 07:01 IST

पारंपरिक उत्साहात, विधिवत परंपरेत गुरुवारपासून ऐतिहासिक म्हसा यात्रा सुरू झाली.

 मुरबाड : पारंपरिक उत्साहात, विधिवत परंपरेत गुरुवारपासून ऐतिहासिक म्हसा यात्रा सुरू झाली. यात्रेला भरपूर गर्दी होते आहे, पण नोटाबंदीमुळे हाती पुरेशी रोकड नसल्याचा फटका यात्रेला बसतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. प्रसिद्ध बैलबाजार खरेदीदारांच्या प्रतीक्षेत आहे आणि सुटे पैसे नसल्याने मनोरंजनाचे खेळही प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत.घोंगड्यांचा बाजार, मिठाईविक्रेते यांनाही अद्याप पुरेशा खरेदीने दिलासा मिळालेला नाही. संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, बिहार, तामीळनाडू, कर्नाटक या राज्यांत प्रसिद्ध असणारी म्हसा यात्रा गुरुवारपासून सुरू झाली. यात्रेत तमाशा, आकाशपाळणे तसेच विविध प्रकारच्या मनोरंजन कार्यक्र मांची रेलचेल आहे. प्रमुख आकर्षण असते, ते बैलबाजाराचे. शर्यतीसाठी लागणारी चपळ जनावरे या यात्रेत मिळत असल्याने नगर, जुन्नर, मंचर, सोलापूर, कोल्हापूरसह ठाणे, रायगड, नाशिक जिल्ह्यांतील शेतकरी यात्रेत हजेरी लावतात. शिवाय घोंगडी, मिठाई, भांडीबाजार भरतो. १५ दिवस चालणाऱ्या यात्रेत किमान ५० लाखांच्या आसपास नागरिक येतात.नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. संसारोपयोगी वस्तूंची व शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची ही खरेदीही येथे मोठ्या प्रमाणात होते. यात्रेच्या पहिल्या दिवशी गर्दीचे प्रमाण फारच कमी असल्याने त्याचा फटका व्यापारी व व्यावसायिकांना बसला.ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस निरीक्षक, २३ अधिकारी, २१० पोलीस कर्मचारी व ५० महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. बेकायदा व्यवसाय किंवा अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून मुरबाडचे पोलीस उपविभागीय अधिकारी एच.टी. व्हटकर व पोलीस निरीक्षक अजय वसावे यांनी तीन पथके तयार केली आहेत. (वार्ताहर)एसटीच्या खास बस : एसटी महामंडळाने वाहतूक निरीक्षक डी.के. भडकमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड ६, ठाणे ६, भिवंडी ६, वाडा ६, शहापूर ३, कल्याण ६ या आगारांच्या बस यात्रेसाठी उपलब्ध केल्या असून पहिल्याच दिवशी ७० फेऱ्या झाल्या. दिवसभरात २०० फेऱ्या करण्याचा संकल्प असून सुमारे दीड लाख उत्पन्न मिळेल, असे त्यांनी सांगितले.