शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा पुनर्विकासात पुन्हा बिल्डरांचंच चांगभलं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:23 IST

वर्तकनगर वसाहतीचा वाद; एकावर खैरात तर दुसऱ्यावर अन्याय

ठाणे : वर्तकनगरच्या म्हाडा वसाहतीसाठी नियमबाह्य पद्धतीने दिलेला प्रोत्साहनपर एफएसआय अधिकृत ठरविण्यासाठी म्हाडा वसाहतीतल्या उर्वरीत पुनर्विकासावर टाच आणण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून होत असल्याचा धक्कादायक आरोप सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला. आजवर वाटलेली ७० हजार चौरस फूट एफएसआयची खैरात नियमित करण्यासाठी पुढील पुनर्विकास प्रस्तावातून तो एफएसआय वजा करावा अशी शिफारस पालिकेने म्हाडाकडे केली आहे. त्यामुळे यापुढील पुनर्विकास व्यवहार्य ठरविताना अडचणी उद्भवण्याची भीती असून एकावर खैरात आणि दुसºयावर अन्याय असे दुटप्पी धोरण अवलंबण्याचा अधिकार पालिका आणि म्हाडाला कोणी दिला, असा सवाल त्यांनी केला आहे.वर्तकनगर येथील म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासासाठी पालिकेने विकास नियंत्रण नियमावलीच्या अ‍ँपेडीक्स आरचा आधार घेऊन १५ टक्के इन्सेन्टिव्ह एफएसआय मंजूर केला होता. २० इमारतींचे आराखडे या वाढीव क्षेत्रासह मंजूर केले आहेत. मात्र, हा नियम म्हाडा पुनर्विकासासाठी लागू होतो की नाही याबाबतचे स्पष्टीकरण पालिकेने मागविल्यानंतर राज्य सरकारने १५ टक्के इन्सेन्टिव्ह एफएसआय देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. २० पैकी काही इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यांना वापर परवानासुद्धा दिलेला आहे. तब्बल ७० हजार चौरस फुटांच्या अतिरिक्त बांधकामाला नियमबाह्य पद्धतीने मंजुरी दिल्यामुळे विकासकांना ३५ कोटींचा वाढीव नफा लाटण्याचा मार्ग मोकळा केल्याचा आरोपही त्यांनी यापूर्वी केला होता. त्यानंतर केलेली चुक दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाने नवी शक्कल लढवली असून ती आणखी विचित्र आणि पुन्हा त्याच विकासकांचेच हित जपणारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.या इमारतींना दिलेला सुमारे ७० हजार चौरस फुटांचा वाढीव एफएसआय नियमित करण्यासाठी म्हाडाच्या अभिन्यासातील एकत्रित एफएसआयमधून तो वजा करावा असा प्रस्ताव पालिकेने म्हाडा प्राधिकरणाकडे पाठविला आहे. म्हाडाच्या एकत्रित एफएसआयची विभागणी प्रो राटा पद्धतीने सर्व पुनर्विकास प्रस्तावांमध्ये समान पद्धतीने केली जाते. आजवरच्या इमारतींना दिलेला ७० हजार चौ. फुटांचा एफएसआय जर वजा केला तर यापुढिल पुनर्विकास प्रस्तावांना कमी एफएसआय उपलब्ध होणार आहे. त्यातून हे पुनर्विकास प्रस्ताव अडचणीत येणार आहेत. पालिका, म्हाडा आणि विकासकांनी केलेल्या या वादग्रस्त कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य नाहक भरडले जाण्याची भीती आहे. त्यामुळे या सर्व वादग्रस्त प्रकरणांची सखोल चौकशी करावी आणि कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे.सर्वसामान्य नागरिक भरडला जाणारवाढीव एफएसआयपैकी ५५ हजार चौरस फुट एफएसआयचे बांधकाम रोखणे पालिकेला सहज शक्य आहे. मात्र, तसे न करता ते बांधकाम नियमित करण्याचा खटाटोप प्रशासन करीत असल्याचे म्हाडाला सादर केलेल्या प्रस्तावातून स्पष्ट होत आहे. काही इमारतींचे बांधकाम सुरू असून त्यांच्याकडून वाढीव बांधकामासाठी कंपाऊंडींग चार्जेस पालिका वसुल करणार असल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे. विकासकांनी तो दंड भरला नाही तर इमारतींना ओसी मिळणार नाही. त्यातून या इमारतींमध्ये घर घेणारे सर्वसामान्य कुटुंब भरडली जाण्याची दाट भीती आहे. ओसी मिळाली नाही तर या इमारती अनधिकृत ठरण्याची सुद्धा भीती आहे. या सर्व प्रक्रियेत सर्वसामान्य नागरिक भरडला जाणार आहे.

टॅग्स :mhadaम्हाडा