शहरं
Join us  
Trending Stories
1
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
2
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
3
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
4
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
5
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
6
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
7
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
8
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
9
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
10
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
11
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
12
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
13
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
14
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
15
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
16
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
17
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
18
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
19
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
20
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले

मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 05:13 IST

मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली आहे.

मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली आहे. या मार्गावर एकूण आठ स्थानके असून, या ठिकाणी मेट्रोच्या जागेत बॅरिकेड्स लावून भू-तांत्रिक तपासणीचे कामही सुरू करण्यात आले आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून मीरा-भार्इंदरमध्ये मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ६ हजार ६०७ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. मीरा-भार्इंदर मेट्रोच्या मार्गावर काशिमीरा नाका, झंकार कंपनी स्टेशन, साईबाबा नगर स्टेशन, दीपक हॉस्पिटल येथे कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी बॅरिकेड्सही लावण्यात आले आहेत. तीन ठिकाणी भू-तांत्रिक तपासणीचे कामही सुरू झाले आहे.हा मार्ग सुमारे ११.१९२ कि.मी.चा असेल. त्यात दहिसर, पांडुरंगवाडी, मीरागाव, काशिगाव, साईबाबा नगर, मेडतीया नगर, शहीद भगतसिंग गार्डन, सुभाषचंद्र बोस स्टेडियम अशी एकूण आठ स्थानके आहेत. या मेट्रो मार्गासाठी भार्इंदरपाडा व दहिसर येथे कार डेपो प्रस्तावित करण्यात आला आहे.मुंबई मेट्रोमार्ग १०चे भूमिपूजनठाणे आणि मीरा रोड शहरांना जोडणाऱ्या गायमुख-शिवाजी चौक-मुंबई मेट्रोमार्ग १०चे भूमिपूजन झाले असून या मेट्रोचा १.२ किमीचा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाºया घोडबंदर रस्त्याच्या बाजूने जाणार आहे.राष्ट्रीय उद्यानातून जाणाºया घोडबंदर रोडच्या विस्तारीकरणाचा प्रकल्प महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला असून त्याला तत्काळ परवानग्या मिळवण्यासाठी प्राधिकरण सक्रिय झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.मुंबई मेट्रो ४च्या वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली मार्गिकांचा विस्तार करण्यात आला असून ही मेट्रो कासारवडवली ते गायमुखपर्यंत पुढे विस्तारित करण्यात आली आहे. मीरा रोडकडे येण्यासाठीही मेट्रोमार्ग विकसित करण्यात येत असून ठाणे आणि मीरा रोड या मार्गावरील जोडणीसाठी ९.२०९ किमी लांबीच्या ८.५२९ किमी उन्नत आणि ०.६८ किमी भूमिगत मेट्रो मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. १ हजार ४३५ मिमी स्टँडर्ड गेजचा मार्ग असून चार उन्नत स्थानके या मार्गावर उभारण्यात येणार आहेत.या मेट्रोची कारशेड मोघरपाडा येथे उभारण्यात येणार असून या प्रकल्पासाठी ८.१३ हेक्टर जमिनीची आवश्यकता भासणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणाºया घोडबंदर रोडच्या बाजूने या मार्गिकांची निर्मिती करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून त्यासाठी प्राधिकरणाकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

>२०११ ते २०१३विस्तृत प्रकल्प अहवाल तयारमेट्रो-३ चा मार्ग निश्चितकेंद्र सरकारला प्रस्ताव सादर'जायका'कडून कर्ज मंजूरकेंद्र सरकारची मंजुरी२०१३ ते २०१७राज्य मंत्रिमंडळाची मान्यताराज्य सरकारची मान्यतापूर्व पात्रता असलेल्या कंत्राटदारांना बोगदे व स्थानकांची स्थापत्य कामेसल्लागारांची नियुक्तीबोगद्याच्या कामासाठी निविदा मागवल्या.२०१५ ते २०१७बोगदे व स्थानकांची स्थापत्य कामे सुरूइंजीन व डबे यासाठी निविदा२०१७ ते २०२०स्थापत्य कामांची पूर्तताचाचणी व प्रमाणीकरण पूर्ण करणे२०१५ ते २०१९गिरगाव काळबादेवीतील पुनर्वसनाचा प्रश्नप्रारंभी स्थलांतरास नकारस्थानिकांसह राजकीय पक्षांची आंदोलनेराज्य सरकारचा हस्तक्षेपपुनर्वसनासाठी खास पॅकेज जाहीरप्रकल्पबाधितांचे समाधानबोगदा खोदण्याची कामे जवळपास ५० टक्के पूर्णस्थानकांच्या उभारणीलाही सुरुवात