शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो येणार; ऑक्सिजनचे कोठार उद्ध्वस्त होणार

By संदीप प्रधान | Updated: March 31, 2025 13:20 IST

Thane News: महाराष्ट्रातील राज्यकर्ते आणि नियोजन मयांचा यापूर्वीही सूतराम संबंध नव्हता व भविष्यातही तो असण्याची शक्यता दिसत नाही. जगभरातील प्रगत देशांत सार्वजनिक आरोग्य, वाहतूक, शिक्षण व्यवस्थेवर भर दिला जातो. या सेवा तिकडे आपल्याकडील खासगी सेवांपेक्षा अधिक उच्च दर्जाच्या असतात.

- संदीप प्रधान(वरिष्ठ सहायक संपादक)

महाराष्ट्रातील राज्यकर्ते आणि नियोजन मयांचा यापूर्वीही सूतराम संबंध नव्हता व भविष्यातही तो असण्याची शक्यता दिसत नाही. जगभरातील प्रगत देशांत सार्वजनिक आरोग्य, वाहतूक, शिक्षण व्यवस्थेवर भर दिला जातो. या सेवा तिकडे आपल्याकडील खासगी सेवांपेक्षा अधिक उच्च दर्जाच्या असतात. मात्र, आपल्याकडे खासगी वाहने कशी वाढतील, यासाठी दोन दशकांत प्रयत्न केले. आता मेट्रोच्या उभारणीतून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वाटचाल सुरू आहे. परंतु, दोन ते अडीच दशकांत बांधकाम व्यावसायिकांनी इंच इंच जमीन बांधायला घेतल्याने मेट्रो कारशेडसाठी जमीन उपलब्ध होत नाही. त्यामुळे अगोदर आरेचे व आता उत्तन येथील जंगल उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यामुळे मेट्रो येणार; पण ऑक्सिजनचे कोठार उद्ध्वस्त होणार आहे. 

राज्य सरकारने १९८० व ९० च्या दशकात मेट्रोची उभारणी सुरू करायला हवी होती. त्याचवेळी मेट्रोचे जाळे उभे केले असते तर मध्य व पश्चिम रेल्वेला पर्याय उभा राहिला असता. मेट्रो एव्हाना दहिसर-बदलापूरपर्यंत गेली असती. मेट्रोच्या कारशेडवरून भाजप व उद्धवसेना यांच्यात मानापमान नाट्य रंगले. अखेर आरे कॉलनीतील २९०० झाडे तोडून कारशेड उभी केली जात आहे. पर्यायी झाडे लावतोय वगैरे खुलासे एमएमआरडीएचे अधिकारी करतील. परंतु, गेल्या पाच-पन्नास वर्षापासून उभी असलेली झाडे, त्याच्या आजूबाजूला असलेला पक्षी, प्राण्यांचा अधिवास संपुष्टात आणायचा व त्या बदल्यात कुठेतरी झाडे लावल्याचे अहवाल तोंडावर फेकायचे ही शुद्ध धूळफेक आहे.

भाईदरकडे येणाऱ्या मेट्रोचे शेवटचे स्थानक सुभाषचंद्र बोस मैदान हे असेल. या परिसरातील जमिनी अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी खरेदी केल्या आहेत. येथील फ्लॅटचे दर चौरस फुटाला १२ ते १५ हजार रुपये आहेत. येथील राई, मुर्धा, मोर्वा गावांत कारशेड प्रस्तावित होती. परंतु, येथील स्थानिकांच्या जमिनींना सोन्याचा भाव बांधकाम व्यावसायिक देत आहेत. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांच्या इशाऱ्यावरून गावकऱ्यांनी कारशेडला विरोध केल्याने या शेवटच्या स्थानकापासून सात ते आठ किमी दूर डोंगरावरील ६० हेक्टर जमिनीत ही कारशेड होणार आहे. एवढी प्रचंड जमीन कारशेडसाठी का हवी, हेही कोडे आहे. येथील १२ हजार ४०० झाडांचा बळी दिला जाणार आहे. यात अनेक औषधी व दैनंदिन वापरासाठी उपयुक्त झाडांचा समावेश आहे. दाट जंगलाच्या या परिसरात बिबटे, कोल्हे, रानडुक्कर व वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजातींचे वास्तव्य आहे. हे जंगल आणि किनारपट्टीचे कांदळवन मीरा-भाईंदर व परिसराला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी कोठारे आहेत. आरेसारखाच हाही निर्णय पूर्णत्वाला नेला जाईल व स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली जाईल.

टॅग्स :thaneठाणेMetroमेट्रोenvironmentपर्यावरण