शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

तळोजा पर्यंत आलेली मेट्रो रेल्वे डोंबिवली ते कल्याण पर्यंत सुरु करा, आमदार सुभाष भोईर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 17:58 IST

एमएमआरडीए व सिडकोच्या माध्यमातून तळोजा पर्यंत आलेली मेट्रो रेल्वे दहिसर मोरी, कल्याणफाटा मार्गे दिवा, डोंबिवली ते कल्याण

डोंबिवली: एमएमआरडीए व सिडकोच्या माध्यमातून तळोजा पर्यंत आलेली मेट्रो रेल्वे दहिसर मोरी, कल्याणफाटा मार्गे दिवा, डोंबिवली ते कल्याण पर्यंत सुरु करण्याची मागणी आमदार सुभाष भोईर यांनी याकरिता आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेत मेट्रो रेल्वे सुरु करण्याची मागणी केली.तळोजा ते कल्याणफाटा दिवा, डोंबिवली कल्याण मेट्रो रेल्वे मागार्चे सर्वेक्षण देखील झाले आहे. तळोजा एमआयडीसीमध्ये मोठमोठे कारखाने असून डोंबिवली व कल्याण ग्रामीण परिसरातून रोजंदारीकरिता तसेच शाळा, कॉलेज करीता येणारा विद्यार्थी वर्ग येथे मोठ्या प्रमाणात रोज हजारोंच्या संख्येने प्रवास करीत असतो. तळोजा ते कल्याण फाटा मार्गे डोंबिवली, कल्याण जंक्शन पर्यंत मेट्रो ट्रेन सेवा सुरु झाल्यास शहरे एकमेकांना जवळ येऊन त्यांचा विकास होईल.मध्य रेल्वेचे दिवा व कल्याण हे महत्वाचे दोन जंक्शन स्टेशन असून या दोन्ही स्टेशनवरती लांब पल्ल्याच्या जवळपास सर्वच गाड्या थांबतात. त्यामुळे दिवा व कल्याण या दोन शहरांना कनेक्टीव्हीटी असलेला तळोजा ते दहिसर मोरी ते कल्याणफाटा ते दिवा, डोंबिवली ते कल्याण अशी मेट्रो रेल्वे सुरु झाल्यास उपेक्षीत असलेला ग्रामीण परिसर व इतर छोटी शहरे एकमेकांशी जोडली जातील. तळोजा ते कल्याणफाटा मार्गे दिवा-डोंबिवली-कल्याण मेट्रो रेल्वे सुरु करुन त्याची स्थानके तळोजा, रोहिंजण, दहिसर, दहिसर मोरी, उत्त्तरशिव, कल्याणफाटा, शिळ, खार्डी, दिवा, डोंबिवली, कल्याण अशी द्यावी. तसेच कल्याण कडील दिशेला कल्याणफाटा, पडले, देसाई नाका, निळजे, काटई, मानपाडा, सोनारपाडा, विको नाका, सुचक नाका, चक्कीनाका, पत्रीपूल, तिसगाव, कल्याण अशी स्थानके द्यावीत, अशी या मागणी केली.