शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

मेट्रोच्या सामंजस्य कराराला ‘ग्रीन सिग्नल’; ठाण्यातील मेट्रोसाठी ४५१५ कोटींचे उभाणार कर्ज

By अजित मांडके | Updated: January 9, 2025 11:26 IST

पुढील पाच वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित करावा लागणार आहे.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अंतर्गत ठाणेमेट्रो प्रकल्पाला मागील वर्षी केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिल्यानंतर राज्य शासनाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी करावयाच्या त्रिपक्षीय सामंजस्य करारनाम्यास मंगळवारी मान्यता दिली. या कामासाठी १२ हजार २०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्चाचा भार मुख्यत्वे केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून उचलला जाणार असून ठाणे महापालिकाही खारीचा वाटा उचलणार आहे. प्रकल्पासाठी विविध माध्यमातून ४ हजार ५१५ कोंटीचे कर्ज घेतले जाणार आहे. या कामाची जबाबदारी ही महामेट्रोवर सोपविण्यात आली असून, पुढील पाच वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित करावा लागणार आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून २०१७ मध्ये अंतर्गत मेट्रोचे स्वप्न पाहण्यात आले होते. त्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा केला होता. त्यावेळेस याचा अंदाजित खर्च हा १३ हजार कोटींच्या घरात जाणार होता; परंतु हा खर्च पालिकेला पेलवणारा नव्हता. त्यामुळे या खर्चाचा भार ‘एमएमआरडीए’ने उचलावा, असेही निश्चित करण्यात आले होते; परंतु मधल्या काळात मेट्रो की एलआरटी? अशा पेचात हा प्रकल्प अडकला. वाढीव खर्चामुळे केंद्राने यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेला सुचविले होते. 

मेट्रो ४ आणि ५ ला जोडणार

शासनावर वाढणारा वित्तीय भार महामेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. यांनी स्थानिक प्राधिकरण, शासकीय-निमशासकीय संस्थांकडील जमिनी उपलब्ध करून घेऊन अशा जमिनी विकसित करून टीडीआर, इतर अनुषंगिक माध्यमातून निर्माण होणाऱ्या आर्थिक स्त्रोतांतून भागविण्यास मान्यता देण्यात आली. अंतर्गत मेट्रो जात असलेल्या मेट्रो ४ आणि ५ या मार्गांना जोडली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले. मेट्रोची काही स्थानकेही मेट्रो चार आणि पाचला जाेडली जाणार आहेत.

असा असेल खर्चाचा वाटा

केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा प्रत्येकी १ हजार १५१.१३ कोटी असणार आहे. तसेच केंद्र व राज्य शासनाला ३५४.११ कोटी प्रत्येकी टॅक्स मोजावा लागणार आहे. याशिवाय ठाणे महापालिकेला २०० कोटींचा भार उचलावा लागणार आहे.

...असा आहे मेट्रो प्रकल्प

  • २९ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात २६ किलोमीटर लांबीचा मार्ग हा उन्नत असून तीन किलोमीटरचा मार्ग भूमिगत आहे. यात २२ स्थानके असणार आहेत. 
  • एक स्थानक हे ठाणे रेल्वेस्टेशनला जोडले जाणार आहे. मुलुंड, ठाण्यामध्ये होऊ घातलेल्या नवीन ठाणे स्टेशनला अंतर्गत मेट्रोचे स्थानक जोडले जाणार असल्याने फायदा प्रवाशांना होणार आहे.
  • अंतर्गत मेट्रो ही ठाणे स्टेशन, नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट आदी भागांतून जाणार असल्याने रहिवाशांसह येथील व्यापारी, उद्योग आस्थापनांना मेट्रोचा फायदा होणार आहे.
टॅग्स :Metroमेट्रोthaneठाणे