शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या राई-मुर्धा येथील मेट्रो कारशेड उत्तनला जाणार, ४ ते ५ हजार कोटींनी खर्च वाढणार - आ. सरनाईक

By धीरज परब | Updated: December 21, 2022 17:03 IST

मेट्रो कारशेडही उत्तन येथील सरकारी जागेवर उभारले जाणार असल्याने मेट्रोचा लाभ उत्तन वासियांना सुद्धा होणार आहे. मात्र कारशेड पुढे नेल्याने ४ ते ५ हजार कोटींचा खर्च वाढणार आहे.

मीरारोड -  भाईंदरच्या राई-मुर्धा गावा दरम्यान होणारी मेट्रो कारशेडही उत्तन येथील सरकारी जागेवर उभारले जाणार असल्याने मेट्रोचा लाभ उत्तन वासियांना सुद्धा होणार आहे. मात्र कारशेड पुढे नेल्याने ४ ते ५ हजार कोटींचा खर्च वाढणार आहे.  तर मुर्धा-मोरवा येथील रस्ता ३० मीटर  इतकाच रुंद केला जाणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झाला असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 

भाईंदरच्या राई - मुर्धा दरम्यान विकास आराखड्यातील ३० मीटर रुंद रस्ता करण्यास बाधित लोकांनी विरोध चालवला होता. रस्त्याचे कामसुद्धा बंद पाडण्यात आल्याने रस्त्याची दुरावस्था झाली. नंतर राई - मुर्धा दरम्यान प्रस्तावित मेट्रो कारशेडला स्थानिकांच्या एका संघटनेमार्फत विरोध चालवला आहे. प्रस्तावित कारशेड आरक्षण विरोधात लोकांनी हरकती घेतल्या आहेत. 

आ. सरनाईक यांना संघटने मार्फत शिष्टमंडळ भेटल्यानंतर त्यांनीसुद्धा कारशेड हलवण्याची मागणी चालवली होती. नागपूर येथील सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी मेट्रो कारशेडचा मुद्दा उपस्थित केला होता. गोंधळsमुळे त्यावर चर्चा न झाल्याने आ. सरनाईकानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कारशेड उत्तन येथे हलवण्याची मागणी केली असता ती त्यांनी मान्य केली आहे. स्थानिकांचा विरोध असल्याने मेट्रो कारशेडचे आरक्षण रद्द केले जाणार आहे. आता उत्तन येथे कारशेड करण्याबाबत एमएमआरडीए नवीन प्रस्ताव तयार करेल व नगरविकास विभागाकडे पाठवेल. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत' अशी माहिती आ. सरनाईक यांनी दिली. भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत येणारी मेट्रो आता उत्तनपर्यंत जाईल. परिसरातील ग्रामस्थांना मेट्रोचा फायदा होईल शिवाय पर्यटन वाढेल.  मेट्रो पुढे नेण्यासाठी व उत्तन येथे कारशेड करण्यासाठी सरकारवर अतिरिक्त ४ ते ५ हजार कोटींचा खर्च होणार आहे. उत्तन येथे शासकीय जमिनीवर डोंगर तोडून मेट्रो कारशेड बनेल.  मेट्रो उत्तनपर्यंत जाणार असल्याने मुख्य रस्ता ३० मीटर इतका रुंद करावा लागणार आहे. 

मेट्रो कारशेड बाबत भुमीपुत्रांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला होता. कारशेड विरोधात सातत्याने शासना कडे मागणी चालवली होती. मुख्यमंत्र्यांनीही स्थानिक भुमीपुत्रांच्या बाजूनेच निर्णय द्यावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे आ. सरनाईक म्हणाले.  

टॅग्स :Metroमेट्रोpratap sarnaikप्रताप सरनाईक