शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

संदेश मौळे करणार एव्हरेस्टवर चढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 03:58 IST

रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील ११ वी विज्ञान शाखेतील संदेश राजाराम मौळे याची आदिवासी विकास विभागाच्या ‘मिशन शौर्य २’ अंतर्गत एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी निवड झाली आहे.

मोखाडा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील ११ वी विज्ञान शाखेतील संदेश राजाराम मौळे याची आदिवासी विकास विभागाच्या ‘मिशन शौर्य २’ अंतर्गत एव्हरेस्ट शिखर चढाईसाठी निवड झाली आहे.मिशन शौर्य ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आदिवासी विभागातील विद्यार्थी विकासासाठीची विशेष योजना आहे. या निवडीने गभालपाडा आश्रम शााळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याने या आश्रम शाळेचे कौतुक केले जात असून संदेशला पुढील अडीअडचणी साठी संघटनेच्या माध्यमातून मदत केली जाईल व एव्हरेस्ट शिखर चढाई करून आल्यानंतर तालुक्यात जंगी मिरवणूक काढून त्याचे स्वागत केले जाईल असे आदिवासी विकास आश्रम शाळा शिक्षक कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सोमनाथ शेवाळे सरांनी लोकमतला सांगितले. यावेळी सर्व चाचण्या व प्रशिक्षणातील परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मुख्याध्यापक हरी पवार, क्रीडा शिक्षक शरद भामरे व शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.या मोहिमेसाठी माझे शिक्षक भामरे सर शेवाळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याने माझी यशस्वी निवड झाली व मी एव्हरेस्ट शिखर चढाई करून तालुक्याचे व माझ्या शाळेचं नावं उचवण्याच प्रयत्न करील.- संदेश मौळे, निवड झालेला विद्यार्थी

टॅग्स :Everestएव्हरेस्टpalgharपालघर