शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदासाठी मीरा-भार्इंदरच्या इच्छुकांना लागली आस

By admin | Updated: February 9, 2017 03:42 IST

आषाढी, कार्तिकी एकादशीला जशी वारकरींना विठ्ठलाला भेटण्याची आस लागते तशीच आस मीरा भाईंदरमधील इच्छुकांना महापौरपदाची लागली आहे.

भार्इंदर : आषाढी, कार्तिकी एकादशीला जशी वारकरींना विठ्ठलाला भेटण्याची आस लागते तशीच आस मीरा भाईंदरमधील इच्छुकांना महापौरपदाची लागली आहे. मीरा भाईंदरचे महापौरपद इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच काढलेल्या सोडतीवरुन स्पष्ट झाले आहे. यामुळे विविध राजकीय पक्षांतील इच्छुकांमध्ये आत्तापासूनच चलबिचल सुरु झाली आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी सध्या नेतृत्वहीन झाल्याने तूर्तास या पक्षातून महापौरपदासाठी इच्छुकच बाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, मेंडोन्सा यांच्या कन्या कॅटलिन व असेन्ला या पदासाठी प्रबळ दावेदार असल्याने त्या विविध पक्षांच्या वजनाचा कानोसा घेत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तसेच काँग्रेसमध्ये माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या मातोश्री व माजी उपमहापौर या एकमेव दावेदार असल्याने तूर्तास काँग्रेसमध्ये या पदासाठी काहीजण इच्छुक असले तरी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे. भाजपात सध्या गटबाजी असल्याने या पक्षांत इच्छुकांची मांदियाळी आहे. परंतु, भाजपा आमदार नरेंद्र मेहता हे राष्ट्रवादीसारखी घराणेशाही सुरु करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पदावर त्यांची भावजय डिंपल मेहता यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी त्याला ब्रेक लावण्यासाठी इच्छुक मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यातच मेहतांचे अंतर्गत विरोधक मानले जाणारे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील हे आपली मुलगी व नगरसेविका कल्पना म्हात्रे यांच्यासाठी प्रयत्नशील राहण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)