शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

मीरा-भार्इंदरमधील सेनेला अल्पावधीतच खिंडार;  शिवसेना नगरसेवक राजू भोईर भाजपात डेरेदाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 21:16 IST

यंदाच्या पालिका निवडणुकीला महिना होत नाही तोवर सेनेच्या गडाला खिंडार पडू लागले.

भार्इंदर, दि. 9 - यंदाच्या पालिका निवडणुकीला महिना होत नाही तोवर सेनेच्या गडाला खिंडार पडू लागले. सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक राजू भोईर तसेच निवडणुकीतील सेनेचेच उमेदवार व राजू यांचे बंधु दिलिप भोईर यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीत भाजपामध्ये प्रवेश केला.

पूर्वाश्रमीचे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक राजू भोईर यांनी २०१२ मध्ये सोईस्करपणे सत्ताधा-यांचा पाठींबा बदलत सत्तेतील महत्वांच्या पदांचा उपभोग घेतला. याच काळातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सुरुवातीच्या सत्तेसाठी पाठींबा देत त्यांनी स्थायी समिती सभापतीपद पटकावले. तर पत्नी भावना यांना महिला व बाल कल्याण समितीचे सभापतीपद बहाल करण्यात आले. या नगरसेवकाने अडीच वर्षानंतर सत्तेचा पट सेना-भाजपा युतीच्या हाती जात असल्याचे पाहुन आघाडीचा पाठींबा काढुन युतीशी मैत्री करणे पसंत केले. यंदाच्या निवडणुकीपूर्वी राजू भोईर यांनी बविआला रामराम ठोकून सुरुवातीला भाजपातुन तिकिट मिळविण्याचा प्रयत्न केला.

परंतु, भाजपाच्या स्थानिक पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध दर्शविल्यानंतर त्यांनी सेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. या निवडणुकीत सेनेने भोईर कुटुंबावर विशेष मेहेरनजर दाखवित चार सदस्यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंत सैनिकांत कमालीची नाराजी पसरली होती. त्यापैकी राजू, त्यांच्या पत्नी भावना व बंधु कमलेश यांचा विजय तर त्यांचे दुसरे बंधु दिलिप यांचा पराभव झाला. 

सेनेच्या तिकिटावर निवडून आल्यानंतरही त्यांचे सेनेच्या अजेंड्यावर मन रमेना. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराची चर्चा काही दिवसांपुर्वी सुरु होती. परंतु, त्याला दुजोरा मिळत नव्हता. अखेर शनिवारी मुख्यमंत्र्यांसह भाजपा खासदार व आमदारांची रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीत खाजगी बैठक असल्याची माहिती मिळताच राजू भोईर यांनी सेनेचे धनुष्यबाण खाली ठेऊन भाजपाच्या कमळात विराजमान होण्यासाठी आ. नरेंद्र मेहता यांना गळ घातली. 

मेहता यांनी राजू यांच्यासह त्यांचे बंधु दिलिप भोईर यांना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश मिळवून दिला. यावेळी भाजपाचे पदाधिकारी व  माजी नगरसेवक आसिफ शेख उपस्थित होते. या पहिल्या टप्प्यानंतर सेनेच्या नगरसेविका भावना व नगरसेवक कमलेश भोईर हे देखील दुस-यांदा भाजपात दाखल होतील, असा दावा शेख यांनी केला आहे. राजू भोईर यांच्या भाजपा प्रवेशाने सेनेच्या गडाला अल्पावधीतच खिंडार पडल्याची चर्चा सुरु झाली आहे. 

नगरसेवक राजू भोईर यांची मीरागाव परिसरात एक तीनमजली इमारत तसेच दुसरी दोन मजली (सध्या दोन मजल्यापर्यंत काम पुर्ण होऊन तिस-या मजल्याचे काम सुरु आहे) इमारतीचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे सांगण्यात येते. या इमारतींवर कारवाई करण्यासाठी भाजपाचेच स्थानिक पदाधिकारी पालिकेकडे पाठपुरावा करीत आहेत. ही बांधकामे वाचविण्यासाठीच एकहाती सत्ता मिळविलेल्या भाजपाच्या आश्रयाखाली भोईर आल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. तसेच या बांधकामांवर कारवाई करण्यासाठी भाजपा सृष्टी मंडळाचे अध्यक्ष गजानन नागे यांनी तर उपोषणाचा इशारा दिला आहे. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेना