लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठिकठिकाणची वाहतूककोंडी, मेगाब्लॉकचा फटका रविवारी ठाण्यातील नीट परीक्षेच्या केंद्रांवरील परीक्षार्थ्यांना बसला. त्यातील काहींना केंद्रांवर पोहोचण्यास दोन ते तीन मिनिटे उशीर झाल्यामुळे त्यांना केंद्र व्यवस्थापकांनी परीक्षेला बसू दिले नाही. नंतर, याप्रकरणी आमदार, स्थानिक नगरसेवकांनी तेथे पोहोचून परीक्षा केंद्र व्यवस्थापकांशी चर्चा केली. पण, आम्हाला वरिष्ठांकडून आदेश आल्यास त्यांच्या पुनर्परीक्षेचा विचार करू, असे त्यांनी सांगितले. मात्र, परीक्षार्थ्यांची तूर्त निराशा झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय सामायिक पात्रता परीक्षा (नीट) रविवारी ठिकठिकाणी घेण्यात आली. सावरकरनगर येथील ज्ञानोदय विद्यामंदिरही या परीक्षेचे केंद्र होते. या केंद्रावर जिल्ह्यातील मुरबाड, माळशेज घाट परिसर, कल्याण, भिवंडी तसेच पनवेल या भागांतून विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. मेगाब्लॉकमुळे, कोणाला शहरातील कोंडीमुळे; तर कोणाला केंद्राचा पत्ता शोधून परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशीर झाला. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास केंद्र व्यवस्थापकांनी नकार दिला. याबाबतीत परीक्षा केंद्र व्यवस्थापकांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी धक्काबुक्की करून बाहेर काढल्याचे आरोप करण्यात आले. या घटनेमुळे काही काळ परीक्षा केंद्रांवर तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक पूर्वेश सरनाईक, कांचन चिंदरकर आदींनी तेथे भेट दिली. त्यांनी केंद्र व्यवस्थापकांशी याबाबत चर्चा केली. मात्र, या नियमानुसार विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आले नाही. मुंबईतही काही केंद्रांवर विविध कारणांमुळे परीक्षार्थ्यांना नीटच्या परीक्षेस मुकावे लागले. रविवारी ही परीक्षा न देऊ शकलेल्यांबाबत आमच्या वरिष्ठ मंडळाने पुनर्परीक्षेचा काही निर्णय घेतल्यास त्यांना परीक्षा देता येईल, असे केंद्र व्यवस्थापकांनी स्पष्ट केल्याचे युवासेनेने सांगितले.मेगाब्लॉकमुळे, कोणाला शहरातील वाहतूक कोंडीमुळे; तर कोणाला केंद्राचा पत्ता शोधून परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशीर झाला. त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास केंद्र व्यवस्थापकांनी नकार दिला. याबाबतीत परीक्षा केंद्र व्यवस्थापकांशी संवाद साधण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करून बाहेर काढल्याचे आरोप करण्यात आले.
‘नीट’च्या परीक्षार्थ्यांना मेगाब्लॉक, कोंडीचा फटका
By admin | Updated: May 8, 2017 06:05 IST