शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

डायघर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दिव्यांग मुलाची आईवडिलांशी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 22:42 IST

उल्हासनगरातील पंजाब कॉलनीतून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला दिव्यांग सुरज तेले हा १२ वर्षीय मुलगा डायघर भागात मिळाला. डायघर पोलिसांनी सतर्कता दाखवून त्याची माहिती ठाण्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिल्यानंतर त्याची त्याच्या आई वडिलांशी भेट घडवून आणण्यात त्यांना यश आले.

ठळक मुद्देबोलताही येत नसल्यामुळे झाला होता पेच रस्ता चुकल्यामुळे उल्हासनगरमधून पोहोचला डायघर भागात

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : डायघर परिसरात भरकटलेल्या सुरज मोहन तेले (रा. पंजाब कॉलनी, उल्हासनगर) या बारावर्षीय दिव्यांग मुलाला डायघर पोलिसांनी सतर्कता दाखवून सोमवारी त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात सुपूर्द केले. अचानक बेपत्ता झालेला हा मुलगा पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन दिवसांनी पुन्हा सुखरूप मिळाल्यामुळे पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.शीळ-डायघर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सहायक पोलीस निरीक्षक एस.आर. सकपाळ, पोलीस हवालदार एस.वाय. पवार, ए.पी. सपकाळे, बी.एम. मांगले, पोलीस कॉन्स्टेबल एस.जी. चौधरी आणि महिला कॉन्स्टेबल एस.आर. तांडेल आदींचे पथक २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. त्याचदरम्यान त्यांना सुरज हा दिव्यांग मुलगा आढळून आला. त्याला बोलताही येत नव्हते. त्यामुळे त्याला त्याचे नाव आणि पत्ता सांगता येत नव्हता. त्याला डायघर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनीही चौकशी करण्याचा प्रयत्न केला. तो कुठूनतरी बेपत्ता झाला असल्यामुळे जाधव यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस नियंत्रण कक्षामार्फत संपर्क साधून त्याची माहिती दिली. उल्हासनगर येथील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात त्याच्या अपहरणाची तक्रार तेले कुटुंबीयांनी दिल्याचे आढळले. तत्काळ त्याचे वर्णन आणि माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याला देण्यात आली. तेव्हा उल्हासनगरच्या पंजाब कॉलनीतील आपल्या घरातून १८ जानेवारी रोजी खेळण्यासाठी तो घराबाहेर पडला होता. त्यानंतर रस्ता चुकल्यामुळे तो पायीच शीळ-डायघर परिसरात भरकटला. बोलता येत नसल्यामुळे त्याला नाव आणि स्वत:चा पत्ताही सांगता येत नव्हता. शिवाय, तो आपल्या कुटुंबीयांची माहितीही देऊ शकत नव्हता. दरम्यान, बराच शोध घेऊनही तो कुठेही न आढळल्यामुळे त्याच्या अपहरणाची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात त्याच्या पालकांनी दाखल केली होती. उल्हासनगरातून बेपत्ता झालेला हा तोच मुलगा असल्याची खात्री झाल्यानंतर सुरजला २० जानेवारी रोजी डायघर पोलिसांनी त्याची आई सुगंधा तेले यांच्या ताब्यात दिले. आपला मुलगा अनपेक्षितपणे सुखरूपरीत्या मिळाल्यामुळे तेले कुटुंंबीयांनी पोलिसांना धन्यवाद दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं