शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

महापारेषणने बोलावलेली बैठक ठरली निष्फळ, मनोरे उभारणार, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:16 IST

Palghar : वाडा, वसई व पालघर या तालुक्यातील गावे यामध्ये बाधित होणार आहेत. त्यासाठी ३० मीटर जागा संपादित करण्यात आली आहे.

वाडा : तालुक्यातील डाकिवली परिसरातून उच्च दाबाची विद्युतवाहिनी जात असून या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम महापारेषणने हाती घेतले आहे. मात्र या वाहिनीमुळे अनेक शेतकरी देशोधडीला लागणार असून त्याचे नुकसान होणार आहे. त्यामुळे वाहिनीस तीव्र विरोध दर्शवला असून जागा न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केल्याने मंगळवारी डाकिवली ग्रामपंचायत कार्यालयात महापारेषणने बोलावलेली बैठक निष्फळ ठरली.२२० के.व्ही. तारापूर-बोरीवली आणि बोईसर घोडबंदर लीलो कुडूस अशी उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात आहे. वाडा, वसई व पालघर या तालुक्यातील गावे यामध्ये बाधित होणार आहेत. त्यासाठी ३० मीटर जागा संपादित करण्यात आली आहे. मात्र हे करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता किंवा पूर्वकल्पना न देता या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातच सन २०१६ साली बनवलेल्या नकाशाप्रमाणे हे काम न करता महापारेषणने मनमानी कारभार करत आपल्या मर्जीप्रमाणे काम सुरू केले आहे. यात डाकिवली गावातील अनेक शेतकरी बाधित झाले असून येथील बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्यांच्या लागवडी क्षेत्रातून जात असल्याने बाधित शेतकऱ्यांचे लागवडी क्षेत्र संपुष्टात येणार आहे. या मार्गाने वाहिनी गेल्यास बहुतांशी शेतकरी यामधून वगळले जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र महापारेषणला हे मान्य नसल्याने शेतकऱ्यांनी आमच्या जागेतून वाहिनी नेऊ नका, अशा स्षप्ट शब्दांत नकार दर्शविला. 

वाहिनी वनजमिनीतून न्या ज्या जमिनीतून ही वाहिनी जात आहे, ती जमीन मातीमोल होणार असल्याने शेतकरी प्रचंड संतापले आहेत.  महापारेषणने गावात असलेल्या दगडखाणी व लागवडी क्षेत्र वगळून यामधून वाहिनी न नेता लोहोपे गावापासून पुढे वनविभागाच्या जागेतून ही वाहिनी न्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

टॅग्स :palgharपालघर