शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

मीरा - भाईंदर पालिका करणार सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:35 IST

ठरणार देशातील पहिली पालिका : महिलादिनी सुरू होणार उपक्रम

- राजू काळे।लोकमत न्यूज नेटवर्क

भार्इंदर : काशिगाव येथील आरक्षण क्र. ३१८ येथे बांधलेल्या तळ मजल्यावरील ओसाड बाजाराच्या जागेत पालिकेच्याच खर्चातून सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन सुरू करण्याचा निर्णय महिला आणि बालकल्याण समितीमार्फत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन करणारी मीरा-भार्इंदर महापालिका देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.

मीरा-भार्इंदर महापालिकेने काशिगाव येथील सिल्व्हर सरिता परिसरातील आरक्षण क्र. ३१८ वर एक दुमजली इमारत बांधून तळ मजल्यावर परिसरातील फेरीवाल्यांसाठी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला फेरीवाल्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने हा बाजार अनेक वर्षांपासून ओसाड पडला होता. या बाजाराच्या जागेत रात्री ओल्या पार्ट्या झोडल्या जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केले होते.

त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी तेथील सुरक्षारक्षकांना जागाच रिकामी करण्याचे आदेश दिले. यानंतर, त्या ओसाड बाजाराची जागा महिला तसेच बालकल्याण समिती व आरोग्य विभागाला वापरण्याची सूचना करण्यात आली. यादृष्टीने महिला आणि बालकल्याण समितीमार्फत विचार सुरू झाला. त्यानुसार, फेब्रुवारीमध्येच झालेल्या समितीच्या बैठकीत त्या जागेत सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सादर केल्यानंतर विभागाने तेथील सुमारे एक हजार चौरस फूट जागेत कारखाना उभारण्याची कार्यवाही सुरू केली. तर, समितीने या उत्पादनासाठी सुरुवातीला चार लाखांच्या निधीची तरतूद केली. अर्थसंकल्पात तशी तरतूद नसल्याने हा निधी रिक्षावाटपाच्या तरतुदीतून पूर्वनियोजित करण्यात आला. त्यातून नॅपकिन तयार करणाऱ्या यंत्रांसह सुमारे १२ महिलांचा प्रशिक्षणात समावेश करण्यात आला. हे उत्पादन जागतिक महिलादिनी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. तत्पूर्वी त्याचे धोरण निश्चित करण्यात येणार असून भविष्यात महिला बचत गट अथवा महिलांच्याच सामाजिक संस्थेला हा कारखाना चालवण्यास देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.नॅपकिनचे उत्पादन शुल्क व त्याचा ब्रॅण्ड समितीमार्फत निश्चित करण्यात आला असून त्याच्या मार्केटिंगसाठी विशेष विक्री पथक नियुक्त केले जाणार आहे. सुरुवातीला हे नॅपकिन सामान्य कुटुंबातील महिलांसाठी उपलब्ध करून दिले जाणार असून त्याच्या वापरासाठी वस्त्यांमधील महिलांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.स्वखर्चाने सॅनिटरी नॅपकिननिर्मिती करणारी मीरा-भार्इंदर महापालिका देशात पहिली ठरणार असली, तरी त्याचे उत्पादन नियमितपणे सुरू ठेवण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात येत आहे. हे नॅपकिन माफक दरात विक्री केले जाणार असून त्याचा दर्जादेखील खाजगी कंपन्यांच्या तुलनेत चांगलाच राखण्यात येणार आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास असे प्रकल्प इतर ठिकाणीसुद्धा सुरू केले जाणार आहेत. - दीपिका अरोरा, सभापती(महिला व बालकल्याण समिती)