शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरकरांसाठी आनंदवार्ता : मार्चमध्ये मिळणार १० एमएलडी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:03 IST

मीरा-भार्इंदरला एमआयडीसीच्या कोट्यातून उपलब्ध झालेल्या ७५ पैकी ५० एमएलडी पाणीपुरवठा एप्रिलपासून मिळण्यास सुरूवात झाली आहे. तर उर्वरित २५ पैकी १० एमएलडी पाणीपुरवठा मार्च २०१८ मध्ये उपलब्ध होणार आहे.

भार्इंदर : मीरा-भार्इंदरला एमआयडीसीच्या कोट्यातून उपलब्ध झालेल्या ७५ पैकी ५० एमएलडी पाणीपुरवठा एप्रिलपासून मिळण्यास सुरूवात झाली आहे. तर उर्वरित २५ पैकी १० एमएलडी पाणीपुरवठा मार्च २०१८ मध्ये उपलब्ध होणार आहे. दरवर्षी ऐन पाणीकपातीत शहराला दिलासा मिळणार असल्याचे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी सांगितले.शहराला एमआयडीसीकडून १०० तर स्टेमकडून ८६ असा एकूण १८६ एमएलडी पाणीपुरवठा सध्या उपलब्ध होत आहे. यात आणखी २५ एमएलडी पाणीपुरवठ्याची भर पडणार असल्याने शहराला भविष्यात २११ एमएलडी पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. पालिकेकडून शहराची लोकसंख्या १० लाखांपर्यंत गृहीत धरण्यात आली असली तरी ती प्रत्यक्षात १२ लाखांवर पोहचली आहे. १० लाख लोकसंख्येच्या प्रमाणात शहराला २३६ एमएलडी पाणीपुरवठ्याची आवश्यकता आहे. यावरून शहराला शिल्लक २५ एमएलडी पाणीपुरवठा उपलब्ध झाल्यानंतरही आणखी २५ एमएलडी पाणीपुरवठ्याची आवश्यकता भासणार आहे. प्रत्यक्षात मात्र १२ लाख लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी भविष्यात मिळणारे पाणीसुद्धा अपुरेच ठरणार आहे. तूर्तास तरी शहरातील पाण्याची समस्या मार्गी लागली असली तरी प्रशासनाने यापूर्वी अपुºया पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी २०११ पासून नवीन नळजोडणी देणे बंद केले होते. यामुळे नवीन इमारतीमधील रहिवाशांना टँकरने पाणीपुरवठा होत होता.सध्या काहीप्रमाणात पुरेसे पाणी शहराला मिळाल्याने त्या नवीन इमारतींना नियमानुसार नवीन नळजोडणी देण्याचे काम सुरू झाले आहे. टँकरचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी शहराची मदार सूर्या धरण प्रकल्पातून मिळणाºया सुमारे २०८ एमएलडी पाण्यावर अवलंबून राहणार आहे. सध्या मिळणाºया १८६ एमएलडी पाणीपुरवठ्यातील ५० एमएलडी पाणी मिळत असून या योजनेतील मुख्य जलवाहिनीचे शहरातंर्गत क्रॉस कनेक्शनच्या कामांसह पाणी साठवणूक करणाºया टाक्यांचे काम अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे ७५ एमएलडीमधील शिल्लक २५ एमएलडी पाणी उचलणे पालिकेला तूर्त शक्य नाही. त्यामुळे ते टप्याटप्याने उचलण्यात येणार असून त्यापैकी १० एमएलडी पाणी मार्च २०१८ मध्ये उचलण्यात येणार आहे.

टॅग्स :Waterपाणी