शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मीरा - भाईंदर मनपा: महापौरपदासाठी भाजपकडून हसनाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 22:35 IST

भाजपमध्ये मतभेद, सिंह, गेहलोत यांनी भरले अर्ज

मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून ज्येष्ठ नगरसेविका ज्योत्स्ना हसनाळे यांनी तर, शिवसेनेकडून अनंत शिर्के यांनी उमेदवारी अर्ज भरला. उपमहापौर पदावरुन भाजपमध्ये मतभेद असून भाजपचे हसमूख गेहलोत आणि मदन सिंह यांनी अर्ज भरले. काँगे्र्रसच्या मर्लिन डिसा यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. भाजप नगरसेवकांचा विरोध व वरिष्ठांनी नगरसेवकांची मते जाणून घेतल्याने माजी आ. नरेंद्र मेहतासमर्थक रुपाली मोदी यांचा महापौरपदासाठी तर ध्रुवकिशोर पाटील यांचा उपमहापौरपदासाठी पत्ता कापल्याने मेहतांना धक्का बसला आहे.२६ फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक होत असून, पालिकेत भाजपचे ६१, शिवसेनेचे २२, तर काँग्रेस आघाडीचे १२ नगरसेवक आहेत. भाजपकडे स्पष्ट बहुमत असले तरी सेनेच्या अनिता पाटील आणि दिप्ती भट. तर काँग्रेसचे नरेश पाटील व अमजद शेख हे भाजपच्या गळाला लागल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. भाजपकडून अन्य काही नगरसेवकांनाही फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंतर्गत रोषामुळे फूट पडण्याची धास्ती असल्याने भाजप नगरसेवकांना गोव्याला, तर सेना नगरसेवकांना लोणावळ्याला नेण्यात आले.भाजपकडे स्पष्ट बहुमतभाजपकडे स्पष्ट बहुमत असून सेना व काँग्रेसचे प्रत्येकी दोन नगरसेवक त्यांच्यासोबत असल्याने त्यांचा महापौर, उपमहापौर सहज निवडून येऊ शकतो. उपमहापौरपद मदनसिंह यांना मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनादेखील चमत्कार घडवण्याची भाषा करत असून, त्यासाठी भाजपचे १८ नगरसेवक फोडण्याची आवश्यकता आहे.शिवसेना व काँग्रेस महाविकास आघाडीने उमेदवारांचे एकत्र अर्ज भरले. सेनेचे अनंत शिर्के महापौर तर काँग्रेसच्या मर्लिन डिसा यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला. यावेळी खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक