शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील टावरे स्टेडियमवर भरणार मीना बाजार; जत्रेच्या परवानगीमुळे खेळाडू नाराज

By नितीन पंडित | Updated: December 5, 2023 19:03 IST

नागरिकांसह खेळाडूंमध्ये नाराजी तर स्टेडियमचे नाव जाणीवपूर्वक बदलण्याचा आयोजकांचा खोडसाळपणा

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहराच्या मध्यभागी असलेल्या स्व. परशुराम धोंडू टावरे स्टेडियमवर महापालिका प्रशासनाच्या वतीने मीना बाजार या जत्रेला परवानगी दिल्याने नागरिकांसह क्रीडाप्रेमी व खेळाडूंमध्ये मनपा प्रशासना विरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे या स्टेडियमला स्वर्गीय परशुराम धोंडू टावरे असे नाव असताना आज मंगळवारी टावरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मीना बाजाराच्या आयोजकांनी शहरभर या स्टेडियमचे नाव धोबी तलाव स्टेडियम असा स्टेडियमचा उल्लेख करणारे बॅनर सर्वत्र झळकवले असल्याने टावरे परिवारासह नागरिकांमध्ये प्रचंड चीड व संताप पसरला असून याप्रकरणी भिवंडी मनपाचे माजी नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेता यशवंत जयराम टावरे यांनी महापालिका आयुक्तांना यासंदर्भात लेखी पत्र देऊन या मीना बाजार जत्रेस विरोध दर्शविला आहे.

महापालिका प्रशासनाच्या वतीने बांधण्यात आलेल्या या क्रिकेट मैदानाकडे मनपा प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष झाले असून खेळाडूंना खेळण्यासाठी कोणतीही सुविधा पुरविण्यात येत नसल्याने खेळाडूंमध्ये नेहमीच नाराजी असते. आता महापालिका प्रशासनाने ७ डिसेंबर ते ११ डिसेंबर असे पाच दिवस या ठिकाणी मीना बाजार या जत्रेला परवानगी दिली आहे. या जत्रेत परवानगी दिल्यामुळे या ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल लागणार असून खेळण्याची दुकाने तसेच आकाश पाळणे या ठिकाणी लावण्यात आली आहे. बाली नावाच्या इसमाने महापालिकेची परवानगी घेऊन हि जत्रा भरवली असल्याचे पालिका वर्तुळातून सांगण्यात येत आहे. मात्र खेळाच्या मैदानावर अशा प्रकारे महापालिका प्रशासनाने जत्रेसाठी परवानगी कशी दिली असा सवाल शहर राहतील नागरिक विचारत आहेत.

टॅग्स :bhiwandiभिवंडी