शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनापुढे गोवरचं मोठं आव्हान, भिवंडीत 8 महिन्यांच्या चिमुरडीचा मृत्यू

By नितीन पंडित | Updated: November 25, 2022 17:35 IST

विशेष म्हणजे या गोवर बाधित रुग्ण बालकांमधील अधिक रुग्ण बालके लसीकरण न झालेले आढळून आलेले आहेत

भिवंडी - भिवंडी शहरात गोवरचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून, कस्तुरबा रुग्णालयात उपचारा दरम्यान इस्लामपूरा मिल्लत नगर येथील आठ महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. चिमुरडीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शहरातील गोवर बाधित मृत्यूचा आकडा तीन वर पोहचला आहे.सध्या शहरात संशयित रुग्णांची संख्या ४०० च्या जवळ पोहचली असताना ४६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या परिस्थितीत भिवंडी पालिका आरोग्य विभाग कामाला लागले आहे.

विशेष म्हणजे या गोवर बाधित रुग्ण बालकांमधील अधिक रुग्ण बालके लसीकरण न झालेले आढळून आलेले आहेत. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन व आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून आता लसीकरण मोहीम राबविण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना करीत असताना गोवर लसीकरण जनजागृती कार्यक्रमात धार्मिक धर्मगुरू, मौलवी, स्वयंसेवि संस्था,वैद्यकीय संघटनां सहभागी होत असताना आता या उपक्रमात शाळकरी विद्यार्थी सुद्धा जनजागृतीसाठी उतरली आहेत.          भिवंडी महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागा मार्फत भिवंडी शहरातील गोवर या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रईस उर्दू माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीचा आयोजन केले होते.रईस उर्दू हायस्कूल ते खजूरपुरा तेथून बाबूचुन्नी मार्केट,खुदाबक्ष हॉल ते पुन्हा रईस हायस्कुल या संपूर्ण अल्पसंख्यांक नागरी वस्ती असलेल्या विभागात ही प्रभात फेरी काढण्यात आली होती.वैद्यकीय विभागाच्या प्रमुख डॉ. बुशरा शेख तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी रईस उर्दू हायस्कूलचे प्राचार्य शिक्षक व विद्यार्थी या उपक्रमामध्ये  यामध्ये सहभागी झाले होते. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणेhospitalहॉस्पिटल