शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये लवकरच होणार फुटबॉलचे मैदान, महापौर राजेंद्र देवळेकरांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 16:04 IST

फुटबॉल खेळाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असणारे फुटबॉलचे मैदान लवकरच तयार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली.

कल्याण, दि. 15 - फुटबॉल खेळाला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असणारे फुटबॉलचे मैदान लवकरच तयार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिली. कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे जिल्हा क्रिडा अधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेला बिर्ला कॉलेजच्या मैदानावर कल्याणात सुरुवात झाली. कल्याण डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर आणि ठाणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रमूख उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

जगप्रसिद्ध असणाऱ्या फिफा स्पर्धांचे काही सामने भारतात व्हावेत या उद्देशाने आज संपूर्ण देशात अशा प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येत आहेत. हे सामने भारतात व्हावे म्हणून युवासेनाप्रमूख आदित्य ठाकरे आधीपासूनच पाठपुरावा करीत असल्याचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने देशभरात ही स्पर्धा होत असून चांगले खेळाडू तयार होण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त असल्याचेही महापौर म्हणाले.

ज्याच्याकडे खिलाडू वृत्ती असते ती व्यक्ती आयुष्यात कधीच मागे राहत नाही. या खिलाडू वृत्तीमूळेच अपयश येऊनही परत उठून उभे राहण्याची उर्मी मिळत असल्याचे मत ठाणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी व्यक्त केले. या स्पर्धेतून एका खेळाडूची जरी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली तर या स्पर्धेचे चीज होईल असेही ते म्हणाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला आमदार गणपत गायकवाड, बिर्ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेश चंद्र, नगरसेवक दशरथ घाडीगांवकर, शिवसेना पदाधिकारी संजय मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.