शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूड पार्कचे काम थांबविण्याचे महापौरांचे आदेश; महासभेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:26 IST

झालेल्या खर्चाची वसुली ठेकेदाराकडून करावी

ठाणे : थीम पार्कपाठोपाठ लोकमान्यनगर भागातील बॉलिवूड पार्कचे कामही थांबवण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. याशिवाय, आतापर्यंत ठेकेदाराला दिलेली रक्कम त्याच्याकडून वसूल करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले आहे. बॉलिवूड पार्कऐवजी या ठिकाणी पूर्वीसारखे उद्यान पुन्हा विकसित करण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.ठाणे महानगरपालिकेच्या मंगळवारच्या महासभेत थीम पार्कबरोबरच बॉलिवूड पार्कच्या चौकशीचे काय झाले, असा सवाल भाजपच्या नगरसेविक मृणाल पेंडसे यांनी केला. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे साहित्य आले नसूनही ठेकेदाराला बिल अदा केल्याचा मुद्दा नगरसेविका आशा डोंगरे यांनी उपस्थित केला. या कामामुळे येथे गर्दुल्ले आणि अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा दशरथ पालांडे यांनी उपस्थित केला. परंतु, ठेकेदाराला आतापर्यंत किती बिल अदा करण्यात आले, असा सवाल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करायची गरजच काय, यात भ्रष्टाचार झाला हे स्पष्ट दिसत असताना ठेकेदारावर मेहरनजर कशासाठी, असा सवाल इतर नगरसेवकांनीही केला. त्यावर अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिराव यांनी या बॉलिवूड पार्कच्या कामाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. मात्र, जोपर्यंत याठिकाणी सर्व साहित्य येत नाही, तोपर्यंत झालेल्या कामाचे मोजमाप करता येणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.आतापर्यंत ठेकेदाराला झालेल्या कामाच्या बदल्यात सहा कोटी ८८ लाखांचे बिल अदा करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. परंतु, त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने लोकप्रतिनिधी आणखी आक्रमक झाल्याचे दिसून आले.भाजपचे नगरसेवक मिलिंद पाटणकर यांनी संबंधित ठेकेदाराला २४ महिन्यांची मुदत देण्यात आली होती, त्या मुदतीत त्याने काम पूर्ण केले नसल्याने आहे ते काम बंद करण्यात यावे, झालेले काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने या कामाची चौकशी करून त्या कामाचे पैसे वसूल करण्यात यावेत, अशी मागणी लावून धरली. अखेर महापौर मीनाक्षी शिंदे यांनी कामाची चौकशी करण्याऐवजी ते काम बंद करण्यात यावे, देण्यात आलेल्या बिलाची वसुली करण्यात यावी आणि पूर्वी होते, तसे उद्यान विकसित करण्यात यावे, असे आदेश दिले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका