शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

उल्हासनगर महापौर निवडणूक : पक्षांचे बहुतांश नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 04:36 IST

महापौर निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी भाजपा आणि शिवसेना समर्थक नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.

- सदानंद नाईकउल्हासनगर - महापौर निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी भाजपा आणि शिवसेना समर्थक नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. भविष्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ््यासमोर ठेवून स्वत:चे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण एकमेकांसमोर दंड थोपटून उभे ठाकले आहेत. शिवसेना समर्थक भारिप आणि काँग्रेसचे दोन्ही नगरसेवक भाजपाच्या तंबूत दाखल झाल्याने, शिवसेनेची चिंता वाढली आहे.उल्हासनगर महापालिकेची सत्ता ओमी टिम आणि साई पक्षाच्या मदतीने भाजपाने काबिज केली. मात्र, आयलानी व कालानी यांच्यात केलेल्या महापौरपदाच्या विभागणीमुळे सत्ता गमावण्याची वेळ आली होती. महापौर पदाला सव्वा वर्ष होताच ओमी टिमच्या मागणीनुसार मीना आयलानी यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. मात्र, आयलानी यांच्या राजीनाम्यामुळे भाजपा व साई पक्षातील एक गट नाराज झाला. साई पक्षात उभी फूट पडून, फुटीर गटाच्या ज्योती भटिजा यांनी सेनेच्या मदतीने अर्ज दाखल केला. भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे पुढे सरसावले असून, त्यांनी ज्योती भटिजा यांना महापौरपदी निवडून आणण्याची जबाबदारी घेतली आहे.साई पक्षाच्या फुटीचा परिणाम भाजपावर झाला असून बहुमत मिळवण्यासाठी पळापळ सुरू आहे. बहुमतासाठी ७७ नगरसेवकांपैकी ३९ नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपाचे ३१, साई पक्षाचे ५, काँग्रेस आणि भारिपचे प्रत्येकी १ व राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक सतरामदास जेसवानी असे एकूण ३९ नगरसेवक भाजपा-ओमी टिम व साई पक्षाच्या आघाडीकडे आहेत. त्यापैकी काँग्रेसच्या अंजली साळवे आणि भारिपच्या कविता बागुल गेल्या वेळी शिवसेनेसोबत होत्या. भारिप व काँग्रेस हे कट्टर भाजपाविरोधी पक्ष असताना, त्या भाजपाच्या गोटात गेल्याच कशा, असा प्रश्न पक्ष कार्यकर्त्यांपुढे उभा ठाकला आहे. शिवसेनेचे २५, साई पक्षाच्या फुटीर गटाचे ७, रिपाइं-पीआरपी गटाचे ३ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४ पैकी ३ असे एकूण ३८ नगरसेवक शिवसेनेकडे आहेत.बंडखोर नगरसेवकांच्या भूमिकेवर सर्वांची नजरभाजपाच्या डेऱ्यात दाखल झालेल्या काँगे्रस, भारिप व राकाँचे बंडखोर नगरसेवक सतरामदास जेसवानी यांची भूमिका महत्त्वाची राहील. राकाँचे गटनेते भरत गंगोत्री यांनी व्हीप जारी करून, भटिजा यांना मतदान करण्यास बजावले आहे. बंडखोर नगरसेवक जेसवानी यांनी तटस्थ अथवा विरोधी मतदान केले, तरी कारवाईचे संकेत गंगोत्री यांनी दिले. काँगे्रसच्या अंजली साळवे आणि भारिपच्या कविता बागुल यांच्यावर पक्षश्रेष्ठींकडून दबाव आणण्याचे काम शिवसेना करीत आहे.भाजपा नगरसेवकाच्या सदस्यत्त्वावर गदा?भाजपाच्या नगरसेविका पूजा भोेईर यांचे सदस्यत्त्व रद्द झाल्याने, एकूण नगरसेवकांची संख्या ७८ वरून ७७ झाली. सोनु छापु यांचेही सदस्यत्त्व जातपडताळणी समितीने रद्द केले आहे. मात्र याविरोधात छापु न्यायालयात गेले असून, महापौर निवडणुकीपूर्वी त्यांच्या सदस्यत्त्वाचा निर्णय घेण्याची मागणी जोर धरत आहे. तसे झाल्यास शिवसेनेला त्यांचा फायदा होणार आहे.गोवा आणि पालघरात नगरसेवकांचा मुक्कामभाजपा-ओमी टिम, साई तसेच काँगे्रस व भारिपचे नगरसेवक गोव्याला तर शिवसेना, रिपाइं-पीआरपी, साई फुटीर गटाचे समर्थक नगरसेवक पालघर येथील फार्महाऊसमध्ये मुक्कामी आहेत. निवडणुकीच्या दिवशी त्यांना महासभेत आणण्यात येणार आहे. काँग्रेस आणि भारिपच्या श्रेष्ठींनी दखल घेतली, तर सेनेच्या मदतीने फुटीर साई पक्ष बाजी मारू शकतो.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरnewsबातम्या