शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मावा मोदकाला महागाईची झळ, गणेशोत्सवापूर्वीच १०-१५ टक्क्यांनी वाढले दर

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: August 28, 2022 19:11 IST

उकडीच्या मोदकापाठोपाठ मावा मोदकही महागले, १० किलो बुंदीचा मोदक @ ३६००

प्रज्ञा म्हात्रे

ठाणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारांचे मोदक बाजारात विक्रीसाठी आले आहेत. मिठाईच्या दुकानांत वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मोदक पाहायला मिळत आहेत. यंदा महागाईमुळे सर्वच दरांत वाढ झाली असल्याने उकडीच्या मोदकापाठोपाठ मावा आणि इतर प्रकारच्या मोदकांचे दर देखील वाढले आहेत. १० किलो बुंदीच्या मोदकाचे दर ३६०० रुपयांवर पोहोचले आहेत.

गणेशोत्सवाला दोन दिवस शिल्लक आहेत. खरेदीची सर्वत्र लगबग दिसून येत आहे. रविवार असल्याने बाजारपेठा गर्दीने तुडुंब भरुन वाहत आहेत. महागाईची झळ सर्वच वस्तूंना बसली असून सर्वच वस्तूंनी दरामध्ये उच्चांक गाठला आहे. याबरोबर बाप्पाचा आवडचा नैवेद्य म्हणून ओळख असलेल्या उकडीच्या मोदकातही ५ रुपयांनी वाढ झाली आहे. ३० ते ३५ रुपये प्रतिनग असे उकडीच्या मोदकाचे दर आहेत. त्याचबरोबर मिठाईच्या दुकानांत गणेशोत्सवाच्यानिमित्ताने उपलब्ध झालेले विविध प्रकारांच्या मोदकांच्या दरांतही १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ६८० रु किलोपासून १२४० रुपयांपर्यंत मोदकांचे दर आहेत. दोनदा दुधाचे दर वाढले त्यामुळे माव्याचेही दरांत वाढ झाली तसेच, इंधनाचा खर्च याचा फटका या मोदकांना बसल्याचे मिठाईच्या दुकानाचे मालक सिद्धार्थ जोशी यांनी सांगितले.मोदकांचे प्रकार मावा मोदक, बुंदी मोदक, काजू मोदक, मलाई मोदक (त्यातही , (मँगो, स्ट्रॉबेरी, पिस्ता, तिरंगा) ड्रायफ्रूट मोदक, कंदी मोदक, जायफळ कंदी मोदक आणि कडक बुंदी मोदक, केशर मलाई, आंबा मोदक, चॉकलेट मोदक हे विविध प्रकार उपलब्ध आहेत. बुंदीचा मोदक१० किलो : ३६०० रुपये५ किलो : १८०० रुपयेमाव्याचा १ किलोचा मोदक : ६८० रुपये किलो

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवthaneठाणे