शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘एबीएल ’ च्या साडे सहा कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी अखेर ठाणे जि.प.ची चौकशी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 19:15 IST

‘ एबीएल ’ चे सहा कोटींचे साहित्य पडून’ या मथळ्याखाली लोकमतने २८ सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिध्द करून हा घोळ उघडकीस केला. याची दखल घेत २९ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या स्थायी समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांनी धारेवर धरत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांना जाब विचारला. यावर फार चर्चा होऊन न देता त्यांनी त्वरीत चौकशी समिती गठीत करण्यास शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश

ठळक मुद्देसुमारे दहा कोटींपैकी सुमारे साडे सहा कोटी रूपयांच्या साहित्यांवर शिक्षण विभागाकडून खर्च‘ एबीएल ’ चे सहा कोटींचे साहित्य पडून’ या मथळ्याखाली लोकमतने २८ सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिध्दत्वरीत चौकशी समिती गठीत करण्यास शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश

ठाणे : अ‍ॅक्टीव्हीटी बेस लर्निंग (एबीएल) हे नाविण्यपूर्ण शिक्षण ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सुरू केले. त्यासाठीच्या सुमारे दहा कोटींपैकी सुमारे साडे सहा कोटी रूपयांच्या साहित्यांवर शिक्षण विभागाकडून खर्चही झाला. पण विद्यार्थ्यांना काहीही शिकता आले नाही. यासाठीच्या चौकशी समितीला प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू होती. पण शनिवारच्या स्थायी समितीमध्ये अखेर चौकशी समिती गठीत करण्यास मान्यता मिळाली आहे.‘ एबीएल ’ चे सहा कोटींचे साहित्य पडून’ या मथळ्याखाली लोकमतने २८ सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिध्द करून हा घोळ उघडकीस केला. याची दखल घेत २९ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या स्थायी समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्यांनी धारेवर धरत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांना जाब विचारला. यावर फार चर्चा होऊन न देता त्यांनी त्वरीत चौकशी समिती गठीत करण्यास शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले. यामुळे आता या समितीकडून एबीएलच्या मनमानी खर्चाची चौकशी करून या घोटाळ्याचे पायेमुळे बाहेर काढण्याची अपेक्षा आता जोर धरू लागली आहे.जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातून जमा झालेल्या सेस फंडातून हा साडे सहा कोटींचा खर्च तत्कालीन प्रशासकाच्या मान्यतेने मनमानीपणे झाला. मात्र तो पूर्णपणे फसलेला आहे. या आवाढव्य खर्चातून गावखेड्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना थोडेही ज्ञान मिळाले नाही. यामुळे हा साडे सहा कोटींचा खर्च निष्फळ ठरला. एबीएलच्या या घोटाळ्याची चौकशी टाळण्याचा प्रयत्नही प्रयत्नही प्रशासनाने केला. या आधी स्थायी समितीच्या बैठकीत समिती गठीत करण्याचा निर्णय होऊनही समिती गठीत केली नाही. त्यासंबंधी सीईओ यांनी देखील सहमती दर्शवण्याला टाळाटाळ केल्याचे जि.प. सदस्य सुभाष घरत यांनी लोकमतला सांगितले.आता गठीत होणा-या चौकशी समितीमध्ये जिल्हा परिषदेतील सुमारे राजकीय पक्षांच्या जि.प. सदस्यांनी घेतले जाणार आहेत. शिवसेना, राष्टÑवादी आणि भाजपा या पक्षांचे जि.प. सदस्य या समितीमध्ये राहणार आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना ही समिती गठीत करण्याची जबाबदारी दिली आहे. या राजकीय सदस्यांसह अधिकारी वर्गही या समितीत घेतले जातील. जिल्हा परिषदेवर तत्काली प्रशासक राज होते. त्यांच्या अधिकाराखाली जि.प. सेस फंडातून या एबीएलवर खर्च झालेला आहे............

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाthaneठाणे