शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

मटकी, सफेद वाटाणा महाग तर चणाडाळ, चणे झाले स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 00:58 IST

कोबी स्वस्त तर फ्लॉवर महाग : भाज्या, किराणा मालात चढउतार

ठाणे :  ठाणे : गेल्या आठवड्यापासून कडधान्य महाग झाली आहेत. या आठवड्यातही तीच परिस्थिती आहे. मटकी, सफेद वाटाणा महाग तर चणाडाळ, चणे स्वस्त झाले आहे. फळांमध्ये डाळिंब, सफरचंद महागच आहे. कोबी स्वस्त तर फ्लॉवर महाग झाला आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.भाज्यांप्रमाणे किराणा मालातही अनेक दिवसांपासून चढउतार पाहायला मिळत आहे. फळांमध्ये फार फळांचे दर कमी किंवा जास्त झाले नसले तरी डाळिंब, सफरचंद महाग आहेत असे फळविक्रेत्यांनी सांगितले. एकीकडे सिमला मिरची, भेंडी, कोबी या भाज्यांचे दर कमी झाले आहेत तर दुसरीकडे भरली मिरची, टोमॅटो, फ्लॉवरचे दर वाढले असल्याचे भाजी विक्रेते ऋषिकेश खांबे यांनी सांगितले. तेलाचे दर अजून वाढलेलेच आहेत. कडधान्यामध्ये एकीकडे मटकी, सफेद वाटाणा महाग तर दुसरीकडे चणाडाळ, चणे स्वस्त झाले असल्याचे किराणा विक्रेत्या पूनम मोरे यांनी सांगितले. यामुळे ग्राहकांमध्ये काही प्रमाणात समाधान आहे.मटकी १३० रुपये किलाेमटकीचे होलसेल दर १२० रुपये किलो तर किरकोळ १३० रुपये किलो, सफेद वाटाणा होलसेल दर ८८ ते ९० रुपये किलो तर किरकोळ १०० रुपये किलो, चणाडाळ ६४ रुपये किलो तर किरकोळ दर ७५ रुपये तर चणे होलसेलमध्ये ५५ रुपये किलो आहे.डाळिंब, सफरचंद महागच डाळिंब आणि सफरचंदाचे दर हे गेल्या आठवड्याप्रमाणे आहेत. ही दोन्ही फळे सध्या महागलेली आहेत. संत्री आणि स्ट्रॉबेरी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत व दरही स्वस्त असल्याचे फळ विक्रेत्यांनी सांगितले.भेंडी ४० रुपयेसिमला मिरची होलसेलमध्ये ४० तर किरकोळमध्ये ६० ते ७० रुपये किलो, भेंडी होलसेलमध्ये ४० तर किरकोळमध्ये ६० ते ७० रुपये किलो, कोबी १० रुपये किलो तर किरकोळमध्ये २० ते २५ रुपये किलो, टोमॅटो  २० तर किरकोळमध्ये ४० किलो, फ्लॉवर १० ते १५ रुपये नग तर किरकोळमध्ये ३० ते ४० रुपये तसेच भरली मिरची होलसेलमध्ये १० ते १५ रुपये किलो आहे.भेंडीच्या दरात फार घट झाली नसून १ ते २ रुपयांनी कमी झाली आहे. स्वस्त असलेले टोमॅटो पुन्हा महाग झाले आहेत. फ्लॉवर १० रुपयांनी विकला जात होता त्याचेही दर वाढले आहेत.    - ऋषिकेश खांबे , भाजी विक्रेतेमटकी १० रुपयांनी, सफेद वाटाणा ६ रुपयांनी वाढले आहे तर चणाडाळ आणि चणे याच्या दरात प्रत्येकी ५ रुपयांनी घट झाली आहे.    - पूनम मोरे,     किराणा विक्रेत्या