शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

बनावट नोटांचा ‘मास्टरमाइंड’ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 03:35 IST

घरमालकाशी झालेल्या वादातून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल कोठून आणले, याची चौकशी सुरू असताना गोळीबार करणारा आशीष शर्मा (३०, रा. दिवा) हा बनावट नोटा तयार करणारा ‘मास्टरमाइंड’ असल्याची खळबळजनक बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली.

ठाणे / मुंब्रा  - घरमालकाशी झालेल्या वादातून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल कोठून आणले, याची चौकशी सुरू असताना गोळीबार करणारा आशीष शर्मा (३०, रा. दिवा) हा बनावट नोटा तयार करणारा ‘मास्टरमाइंड’ असल्याची खळबळजनक बाब पोलीस तपासात निष्पन्न झाली. त्याच्याकडून २०००, १००, २०० रुपये दर्शनीमूल्य असलेल्या एक लाख नऊ हजार ६५० रुपयांच्या बनावट नोटाही हस्तगत केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी दिली.घोडबंदर रोड येथे वास्तव्यास असलेल्या संजीवकुमार गुप्ता यांची दिव्यात रूम आहे. तिथे आशीष शर्मा हा भाडेकरू म्हणून वास्तव्याला होता. या दोघांमध्ये वाद झाला. शर्माने ५ जुलै रोजी दिव्यातील अनिल अपार्टमेंटमध्ये गुप्तावर गोळी झाडून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर चौकशी केली असता, तो आपल्या घरातच बनावट नोटा तयार करतो, हे कळले. त्या नोटांची देवाणघेवाण करताना धोका निर्माण झाल्यास स्वत:च्या सुरक्षेसाठी एक गावठी कट्टा आणि १५ जिवंत काडतुसेही खरेदी केल्याची कबुलीच त्याने दिली. त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या राहत्या घराची झडती घेतली. तेव्हा तिथे २००० च्या २२, २०० च्या १८८, तसेच १०० च्या ३३२, पन्नासच्या १४५, वीस रुपयांच्या ५३ आणि दहा रुपयांच्या ५४ अशा एक लाख नऊ हजार ६५० इतक्या दर्शनीमूल्य असलेल्या ७२४ बनावट नोटा तसेच त्या तयार करण्यासाठी वापरलेला स्कॅनर, प्रिंटर, कैची आणि पेन आदी साहित्य तसेच एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले.भोईवाड्यातही गुन्हाशर्मा या भाडेकरूचा गुप्ता (घरमालक) याच्याशी दोन हजार रुपयांवरून वाद झाला होता. गुप्ताने घरासाठी सहा हजार रुपये अनामत रक्कम घेतली होती. त्यातील चार हजार त्याने शर्माला परतही केले होते.घराची साफसफाई केल्यानंतर उर्वरित दोन हजार रुपयेदेखील घेऊन जा, असेही त्याने शर्माला सांगितले. यातूनच त्याने गुप्ताला मारहाणही केली होती.हाच वाद चिघळल्यानंतर त्याने त्याच्यावर थेट गोळीबार करून त्याच्या खुनाचाही प्रयत्न केला. शर्मावर मुंबईच्या भोईवाडा पोलीस ठाण्यातही हाणामारीचा गुन्हा दाखल असल्याचे मुंब्रा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हाthaneठाणे